Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

How to Control High Cholesterol : शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
How to Control High Cholesterol :
How to Control High Cholesterol : Sakal
Updated on

How to Control High Cholesterol : हाय कोलेस्टेरॉलची समस्या वेळेवर नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. कारण कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात न ठेवल्यास हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. भारतातील एक पारंपारिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ असलेले विड्याचे पानं केवळ ताजेपणा आणि चव यासाठीच खाल्ले जात नाहीत तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

सकाळी उठल्याबरोबर विड्याचे पानं चघळण्याचे फायदे अनेक लोक सांगतात. विशेषत: कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते. हा एक नैसर्गिक आणि पारंपारिक उपाय असू शकतो, जो कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. परंतु निरोगी जीवनशैली, आहार आणि नियमित शारीरिक हालचालींसह वापरल्यास ते सर्वात प्रभावी ठरेल.

सुपारीच्या पानांच्या सेवनासोबतच तुम्ही संतुलित आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यात मदत होऊ शकते. पण हे देखील खरे आहे की सकाळी उठल्याबरोबर विड्याचे पानं चघळल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी दिवसभर नियंत्रणात राहते, पण ते कसे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.