Healthy Routine Tips : दिवसाच्या रूटीनमध्ये या सवयी लावा; डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही

सकाळच्या वेळी येणारी सूर्याची कोवळी किरणे शरीरासाठी खूप फायदेशीर
Healthy Routine Tips
Healthy Routine Tips esakal
Updated on

Healthy Routine Tips : नेहमीच दवाखाना लागला आहे बग, एक झाले की एक लोक आजारी पडत आहेत. अशी चर्चा तूमच्याही मित्रांमध्ये होत असेल. पण, याला त्या लोकांच्या सवयी जबाबदार असतील हा विचार सोडून बाकी सगळ्यावर विचार आणि उपाय केले जातात. कारण, लोकांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा वारंवार येणाऱ्या आजारांचे कारण बनत आहेत.

Healthy Routine Tips
Health Tips: 'या' टिप्स फॉलो करा, कामाच्या मधात तुम्हाला येणारा आळस आणि झोप आपोआप होईल दूर

हे असे आजार दूर करण्यासाठी डॉक्टर आणि औषधांना खूप पैसा खर्च करावा लागतो. एवढा पैसा खर्च करूनही अनेक आजार पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत, तर ते आजार फक्त नियंत्रणात ठेवता येतात. अशात मधुमेह, लठ्ठपणा आणि बीपी यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे तुम्हाला महागड्या डॉक्टरांची फी आणि औषधांवर जास्त पैसा खर्च करायचा नसेल, तर आजपासून काही चांगल्या सवयी स्वत:ला लावून घ्या.

Healthy Routine Tips
Healthy Tips : आंबे खाल्ल्यानंतर हे 6 पदार्थ खाणे टाळा अन्यथा...

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे

सकाळच्या वेळी येणारी सूर्याची कोवळी किरणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. याशिवाय सूर्याच्या किरणांच्या प्रकाशात नदीवर स्नान केल्याने त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर राहतात. झोपेची समस्या असेल तर कोवळी किरणे शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार करते. जे चांगल्या झोपेसाठी आवश्यक मानले जाते. थोडा वेळ उन्हात बसल्याने मनावरील तणाव देखील दूर होतो.

Healthy Routine Tips
Morning Routine : सावधान! सकाळच्या 'या' चुका ठरताय तुमच्या लठ्ठपणाला कारणीभूत

दररोज वर्कआऊट करा

दिवसाची सुरवात एनर्जीने करायची असल्यास सकाळी वर्कआउट करा. त्यासाठी दररोज 20-30 मिनिटे काढा. गोज व्यायाम केल्याने आजार दूर राहतात. आणि तूमचे आयुष्यही वाढते. वर्कआऊट म्हणजे जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळणे असा नाही तर घरातील सामान्य कामे करूनही तुम्ही सहज फिट राहू शकता. त्यामुळे योगासने, दोरीवर उडी मारणे, चालणे यासारखे अनेक प्रकार आहेत.

► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/user/sakaalpa...

साधा सकस आहार घ्या

कोलेस्टेरॉल, मधुमेह, हृदयाच्या समस्यांसारखे धोकादायक आजार टाळायचे असतील. तर तुमच्या आहारातून तेलकट, मसालेदार आणि जंक फूड पूर्णपणे वगळा. तसेच साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करा. साधे अन्न खा, जे केवळ शरीरच नाही तर मन देखील निरोगी ठेवते. तसेच जेवणाची वेळही निश्चित करा. ज्यामूळे अवेळी जेवण होणार नाही.

Healthy Routine Tips
Sleep Routine : साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर सावधान!

भरपूर पाणी प्या

शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पाणीही खूप महत्त्वाचे आहे. दिवसभरात किमान 6 ते 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. तसेच लठ्ठपणावरही नियंत्रण ठेवता येते.

Healthy Routine Tips
Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट

पुरेशी झोप घ्या

शरीर आणि मन निरोगी ठेवण्यात झोपेचा मोठा वाटा आहे. शांत झोपेमुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. काही कामावर लक्ष केंद्रित करू शकता. स्मरणशक्ती बरोबर राहते आणि पचनक्रियाही बरोबर राहते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी मोबाईल, टीव्हीचा वापर कमी करणे चांगले राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()