Vitamins Deficiency: सर्वच महिलांना किंवा पुरूषांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. चेहऱ्याचे सौंदर्य वाढल्यास आत्मविश्वास वाढतो. यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचा चमकदार दिसण्यासाठी अनेक लोक महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरतात. पण तरीही त्वचा काळी पडू लागते आणि हा काळपटपणा दिवसेंदिवस वाढत जातो.
जर तुमचा चेहरा देखील काळा पडत असेल तर किंवा त्वचेचा रंग असमान दिसत असेल तर हे व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी सारख्या विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. इतर जीवनसत्त्वांसह या दोन जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग आणि चमक कमी होते.
याशिवाय व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग आणि चमक यावरही परिणाम होतो. त्यामुळे या जीवनसत्त्वांची कमतरता वेळीच ओळखून ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.