Gastric Problem: अनेक लोकांच्या अयोग्य खाण्याची वेळ आणि खराब जीवनशैलीमुळे पोटातील गॅस आणि अपचनाच्या समस्या निर्माण होतात. यामुळे आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटातील गॅस आणि अपचनाच्या समस्या असल्यास कडधान्यांचे सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. कारण काही डाळींचे सेवन केल्यास पोटात गॅश निर्माण होऊ शकतो. खरं तर उडीद आणि हरभरा डाळीमुळे गॅस तयार होतो. पण काही डाळी अशा आहेत ज्या खाल्ल्याने पोटात गॅश तयार होऊ शकत नाही. पण या डाळीचे सेवन प्रमाणात केल्यास पोटाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया असा कोणत्या डाळी आहेत ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होणार नाही.