Heart Attack In Winter : हिवाळ्यात वाढतो हृदयविकाराचा धोका, अशी घ्या काळजी

सान्यतः हिवाळ्यात हृदयविकाराच्या केसेस वाढलेल्या दिसतात. त्यामुळे या काळात हृदयाची विशेष काळजी घ्यायला हवी.
Heart Attack in Winter
Heart Attack in Winteresakal
Updated on

Winter Health Care Tips : हिवाळा येताच सर्दी खोकला, ताप, व्हायरल आजार सुरू होतात. पण यात सर्वात धोकादायक हृदयविकाराचा झटका असतो. याचा धोका हिवाळ्यात जास्त वाढतो. या धोक्यातून वाचण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.

या लोकांना असतो सर्वाधिक धोका

एका संशोधनानुसार ज्या लोकांचं वजन जास्त आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा लोकांना हिवाळ्यात ३० पट हृदयविकाराचा धोका वाढतो.

Heart Attack in Winter
Winter Recipe: घरच्या घरी बनवा अगदी रेस्टॉरंट सारखे चवदार टोमॅटो सूप...

रक्त गोठल्याने येतो हृदयविकाराचा झटका

थंडीत आपल्या नसा आकुंचन पावल्याने दबाव वाढतो. यामुळे ब्लड प्रेशर वाढू लागतं. बीपी वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता वाढतात. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात थंडीमुळे रक्त घट्ट व्हायला लागतं. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

Heart Attack in Winter
Winter Tips: आरोग्यदायी मोहरीच्या तेलाचे ‘हे’ आहेेत फायदे; तुमचे केस आणि त्वचा दोन्ही ठेवते तंदुरुस्त

सकाळी धोका अधिक

हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण हिवाळ्यात बहुतांश वेळा सकाळी असतं. सकाळी वातावरण गार असल्याने शरीराचं तापमान पण कमी झालेलं असतं. अशात शरीराचं तापमान वाढवण्यासाठी बीपी वाढतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतो.

Heart Attack in Winter
Water intake in Winters : हिवाळ्यात जर तुम्ही पाणी पिणं कमी केलं असाल तर, आताच सावध व्हा

अशी घ्या काळजी

  • सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान फिरायला जाऊ नये. ९ वाजेनंतर जावं.

  • मीठ कमीत कमी खावं

  • उन्हात जास्तीत जास्त वेळ घालवा.

  • रोज थोडीफार एक्सरसाइज करा.

  • डाएट कंट्रोलमध्ये ठेवा. तळलेलं, गोड खाऊ नका.

  • गरम कपडे वापरा. स्वतःला कपड्यांनी झाकून गरम ठेवणं फार आवश्यक असतं.

  • नियमित बीपी तपासा. विशेषतः उच्च रक्तदाबाच्या लोकांनी ही काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.