पुरूषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराचा अधिक धोका, त्वरीत जाणून घ्या लक्षणे नाहीतर..

अलीकडे पुरूषांबरोबरीने महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
heart attack
heart attacksakal
Updated on

सहसा पुरूषांना हृदयविकाराचा झटका जास्त येत असतो. पुरुषांना हृदयविकाराचा झटका हा तीन टर्ममध्ये येत असतो मात्र महिलांच्या बाबतीत तसं नसतं. महिलांचा शक्यतो पहिल्याच झटक्यात मृत्यू होतो.त्यामुळे पुरूषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो.

अलीकडे पुरूषांबरोबरीने महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हृदयातील रक्तभिसरणात बिघाडी झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो. महिलांना जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्याची लक्षणे महिलांना एका महिन्यााधीच दिसू लागतात. ही लक्षणे नेमकी कोणती, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

heart attack
पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त डास चावतात, कारण ऐकूण व्हाल थक्क

लक्षणे :

१. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिन्याभरापुर्वीपासून शरीर थरथरायला सुरवात करते.त्यामुळे महिलांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.

२. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस महिलांना झोप येत नाही.

३. महिन्याभरापुर्वी महिलांना पोटदुखीची समस्या जाणवते.

४. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिलांना तीव्र डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवते.

heart attack
तुमच्या त्वचेवर आलेल्या कांजण्या की Monkeypox? आता ओळखणं होणार सोपी

५. महिलांना जेव्हा वारंवार शकवा जाणवतो, तेव्हा समजून जायचे की हे हृदयविकाराचे लक्षण आहे.

६. हृदयविकाराच्या झटका येण्यापुर्वी छातीच्या डाव्या बाजूला दुखणे, ताणणे जाणवते.

7. हृदयाचे ठोके जास्त असामान्य वाटत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.