Heart Health: वाढत्या वयानुसार हृदयाची काळजी घ्यायचीय? मग, 'या' गोष्टींकडे द्या लक्ष, राहाल निरोगी

Healthy Heart Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
Heart Health
Heart Healthesakal
Updated on

Heart Health : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. जर या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल साधला तर आरोग्य निरोगी राहते. वाढत्या वयानुसार हृदय निरोगी ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आणि सवयींकडे नीट लक्ष दिले तर हृदयविकारापासून दूर राहता येते.  

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्वाची भूमिका पार पाडतात. परंतु, आजकाल धकाधकीचे जीवन, फास्टफूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हृदयविकाराची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

परंतु, जर तुम्ही काही गोष्टींची नीट काळजी घेतली आणि तुमची जीवनशैली सुधारली तर हृदयासोबतच आरोग्य निरोगी ठेवता येऊ शकते. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Heart Health
Monsoon Health : पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल तर, आहारात 'या' इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्सचा करा समावेश

सोडिअम-साखरेची पातळी कमी करा

हृदय आणि आरोग्य निरोगी ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही आहारातील काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जसे की, आहारात सोडिअम-साखरेचे प्रमाण कमी असणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. कारण, सोडिअमचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

त्यामुळे, आहारातून सोडिअम-साखरेची पातळी कमी करा. तसेच, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखर आणि मीठ यांचे भरपूर प्रमाण असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा. जेणेकरून तुमचे हृदय निरोगी ठेवता येईल.

आहारात पोषकघटकांचा करा समावेश

हृदय निरोगी ठेवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या आहाराकडे नीट लक्ष द्यायला हवे. त्यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्या, बीन्स, संपूर्ण धान्य, मोड आलेली कडधान्ये, प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करू शकता. ताजी फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.

ज्यामुळे, जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत होते. हृदयाशी संबंधित समस्यांसाठी या दोन्ही गोष्टी जबाबदार मानल्या जातात. त्यामुळे, तुमच्या आहारात अधिक पोषकतत्वे असलेल्या गोष्टींचा समावेश करा. जास्तीत जास्त घरी बनवलेल्या अन्नाचे सेवन करा. जेणेकरून तुमचे हृदय आणि आरोग्य निरोगी ठेवता येईल.

Heart Health
Yoga For Heart Health : ह्रदयविकारापासून दूर राहायचे असेल तर आठवड्यातून एकदातरी व्यायाम कराच, वाचा फायदे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.