Heatwave 2024 : उन्हाने केला होता कहर! 'या' देशात 44 दिवसात झाले होते तब्बल 56 हजार मृत्यू

Heatwave Deaths : उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये उन्हामुळे लोकांचा मृत्यू
Heatwave Deaths Continue in India, Recalling 2010 Russia Tragedy
Heatwave Deaths Continue in India, Recalling 2010 Russia Tragedyesakal
Updated on

Health Update : यंदाच्या वर्षी उन्हाच्या झळा खूप जास्त वाढल्या आहेत. अश्यात उत्तर भारतातील अनेक भागात तीव्र उकाडा आणि उष्माघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या डझनभरापेक्षा जास्त झाली आहे. एक वेळ 2010 साली जगातील सर्वत्र हीटवेव्हमुळे मृत्युचा विक्रम झाला होता.

ही घटना रशियामध्ये घडली होती. त्या वर्षी रशियामध्ये ४४ दिवसांच्या उन्हामुळे ५६ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा रशियामधील तापमान किती होते ते जाणून घेऊया.

नौटपाचे (अतिउष्णतेचे ९ दिवस) सध्या सुरू असून संपूर्ण उत्तर भारतात तीव्र उष्णता थैमान घालत आहे. उत्तर भारताच्या अनेक भागात तापमान ५० अंश सेल्सियसच्या आसपास आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये उन्हामुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत.

जगातील एका देशात हीटवेव्हमुळे मृत्युचा विक्रम झालाय होता. एका सीझनमध्ये ५६ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.ही अतिउष्णतेची घटना रशियामध्ये घडली होती. ही घटना २०१० सालची आहे.

Heatwave Deaths Continue in India, Recalling 2010 Russia Tragedy
Homemade Salads : उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा 'हे' ५ सॅलड

त्या वर्षी झालेल्या उष्णतेने हजारो लोकांचा बळी गेला. तेव्हाचे तापमान ४४ अंश सेल्सियसच्या आसपास होते. 2010 मध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये रशियामध्ये तीव्र लू पडली होती. मॉस्कोने अहवाल दिला होता की, जुलै महिन्यातच 14,500 लोकांचा मृत्यू झाला आणि ऑगस्टमध्ये 41,300 लोकांचा मृत्यू झाला.

हा रशियन सरकारने जारी केलेला अधिकृत आकडा होता. रशियन आर्थिक विकास मंत्रालयाच्या मासिक आर्थिक अहवालात असे सांगण्यात आले आहे.

याच अहवालात सांगण्यात आले आहे की, या 44 दिवसांच्या उन्हामुळे लोकांमध्ये जठरा रोग आणि कॅन्सर देखील झपाट्याने वाढू लागले. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर 2010 मध्ये रशियामध्ये झालेल्या 44 दिवसांच्या उन्हामध्ये 56 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण?

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या अहवालातही जगभरात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यूला मानवच जबाबदार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 1991 ते 2018 पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर, अहवालात म्हटले आहे की उष्णतेमुळे होणारे 37 टक्के मृत्यू केवळ मानवी क्रियाकलापांमुळे झाले आहेत.

उच्च तापमानाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू याबाबतची माहिती गोळा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. यासाठी जगभरातील 73 देशांतील 732 भागांमधून डेटा गोळा करण्यात आला.

Heatwave Deaths Continue in India, Recalling 2010 Russia Tragedy
Food Poisoning in Summer : अन्न विषबाधेचा धोका वाढतोय ; बचावासाठी फॉलो करा 'या' टिप्स

यानंतर जारी करण्यात आलेल्या अहवालात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, तापमान वाढले की वारे अधिक गरम होतात. त्याचा सर्वात मोठा थेट परिणाम वृद्ध तसेच अस्थमाच्या रुग्णांवर होत आहे. यामुळे त्यांचा अकाली मृत्यू होतो. हे संशोधन नेचर क्लायमेट चेंज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मानवी क्रियाकलाप हे जागतिक तापमानवाढीचे प्रमुख कारण असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.