Hemoglobin वाढवण्यासाठी घरीच बनवा ही चटपटीत रेसिपी, नोट करा बनवण्याची पद्धत

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोक महागडे टॉनिक, औषधे आणि आयरनच्या गोळ्या खातात.
Hemoglobin
Hemoglobinesakal
Updated on

Recipe For Increasing Hemoglobin : जेव्हा शरीरात रक्त कमी होते किंवा हीमोग्लोबिनचा स्तर कमी होतो, तेव्हा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, त्वचा पिवळी पडू लागते आणि स्नायूंमध्ये क्रॅम्प्सही येतात. डोकेदुखी, चक्कर येणे आणि सतत थकवा जाणवणे ही देखील शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे आहेत. याशिवाय शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्याही उद्भवते. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोक महागडे टॉनिक, औषधे आणि आयरनच्या गोळ्या खातात.

पण तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचारांसोबत घरीच काही हेल्दी पदार्थांचे सेवन केले तर तुमची हिमोग्लोबिनची पातळी वाढेल. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या संतोष यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये नैसर्गिकरीत्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी एक खास रेसिपी शेअर केली आहे. तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली असेल तर चिंता करू नका. या खास रेसिपीने तुमचा हिमोग्लोबिनचा स्तर नियंत्रणात राहील.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ही हेल्दी रेसिपी ट्राय करा

रेसिपीसाठी लागणारं साहित्य

½ टीस्पून तूप किंवा तेल

1/4 टीस्पून मोहरी

चिरलेला कांदा

1/4 टीस्पून हळद पावडर

चवीनुसार रॉक सॉल्ट

१/४ टीस्पून सुंठ पावडर

एक वाटी मोरिंगा किंवा ड्रमस्टिक्सची पाने

Hemoglobin
Healthy Food : इरेक्शनपासून शक्तीपर्यंत; या एका पदार्थाच्या सेवनाने पुरुषांना मिळतात अनेक फायदे

बनवण्याची पद्धत

गॅसवर फ्राय पॅन किंवा तवा ठेवा. त्यात तूप किंवा तेल घालून थोडे गरम होण्याची वाट पाहा. आता त्यात मोहरी टाका आणि काही सेकंद शिजवा. त्यानंतर कांदे घालून हलके परतून घ्या. आता मीठ, हळद आणि सुंठ पावडर घालून काही सेकंद शिजवा. (Hemoglobin) शेवटी, या रेसिपीमध्ये ड्रमस्टिकची पाने घाला आणि हलके तळा. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीची तुमची आयुर्वेदिक रेसिपी तयार आहे. याचे नियमित सेवन केल्याने केवळ अशक्तपणा दूर होण्यास मदत होणार नाही, तर आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे मिळतील. (Health)

Hemoglobin
Hemoglobin Decreased Symptoms : शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले आहे हे कसे ओळखाल? हि आहेत लक्षणे...

फायदे

  • महिलांमध्ये आईचे दूध वाढण्यास मदत होते

  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

  • केस गळणे थांबवते

  • उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

  • हृदय निरोगी राहते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.