High Calcium Foods : दूध-पनीर नाही तर या 5 गोष्टींमधून मिळेल भरपूर कॅल्शियम, साठीतही हाडे राहतील मजबूत

कॅल्शियममध्ये पोषक तत्व असतात, जे ब्लड क्लॉटिंग, मांसपेशी सुरळीत ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावते.
High Calcium Foods
High Calcium Foods esakal
Updated on

High Calcium Foods : शरीर आतून योग्यप्रकारे कार्य करण्यासाठी ज्याप्रमाणे प्रोटीन आणि लोहाची गरज असते त्याचप्रमाणे कॅल्शियमचीसुद्धा गरज असते. कॅल्शियममध्ये पोषक तत्व असतात, जे ब्लड क्लॉटिंग, मांसपेशी सुरळीत ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावते. याशिवाय इम्यून सिस्टिम वाढवण्यास आणि हाडे, दात, हृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यासही मदत करते. दूध आणि पनीर कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे असे मानले जाते. पण त्याचबरोबर आणखी काही असे पदार्थ आहेत जे खाऊन तुमच्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा भरून निघेल.

काही लोकांना डेअरी प्रोडक्ट्सची अॅलर्जी असते. तेव्हा आज आपण नॉन डेअरी प्रोडक्ट्स जाणून घेणार आहोत ज्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियमची मात्रा असते.

चिया सिड्स

फक्त दोन चमचे या लहान, पोषक तत्वांनी युक्त बियांमध्ये अंदाजे 177mg कॅल्शियम असते. एवढेच नाही तर या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडही मुबलक प्रमाणात आढळते. तुम्ही ज्यूसमध्ये किंवा स्मूदीमध्ये या सिड्स घालू शकता किंवा सॅलडवरही टाकू शकता.

High Calcium Foods
Bone Health : तुमच्या या 5 चुकीच्या सवयींमुळे हाडे होतात कमकुवत, आजच सोडा, नाहीतर...

गडद रंगाच्या हिरव्या पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक प्रमाणात असते. या यादीत सगळ्यात जास्त कॅल्शियम असणारी भाजी म्हणजे पालक. एक कप शिजलेल्या पालकेत १८० मिलीग्राम कॅल्शियम असते. तर एक साध्या पालकमध्ये २५० मिलीग्राम कॅल्शियम असते. तसेच त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असते. (Health)

बदाम

एका मुठ बदाममध्ये (२३) बदाममध्ये ७५ मिलीग्राम कॅल्शियम असते. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटची मात्रा मोठ्या प्रमाणात असते.

High Calcium Foods
Milk And Calcium: तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शियमची गरज दूध पूर्ण करत का?

टोफू

तुम्ही टोफू खाऊनही कॅल्शियमची गरज पूर्ण करू शकता. अर्धा कप टोफूमध्ये ८६१ मिलीग्राम कॅल्शियम मिळू शकते. याशिवाय यात प्रोटीनचे प्रमाणही भरपूर असते. भाज्यांसह टोफू तुम्ही फ्राय करू शकता.

अंजीर

१ कप कोरड्या अंजीरमध्ये १६२ मिलीग्राम कॅल्शियम असते. यात फायबर आणि पोटॅशियमची मात्राही भरपूर प्रमाणात असते. अंजीरमध्ये मॅग्नेशियमही मोठ्या प्रमाणात असते. हे खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होतात, आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()