High Cholesterol : रोज हे 5 ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवून खा, औषधांशिवाय कमी होईल कोलेस्ट्रॉल

आज आम्ही तुम्हाला 5 ड्राय फ्रूट्सबद्दल माहिती देणार आहोत, जे भिजवून खाल्ल्यानंतर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
High Cholesterol
High Cholesterolesakal
Updated on

High Cholesterol : कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा दिसणारा पदार्थ शरीराच्या सर्व पेशींद्वारे तयार होतो. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक असलं तरी जेव्हा त्याचे प्रमाण जास्त होते तेव्हा हृदयविकार, वजन वाढणे, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या समस्या उद्भवतात. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत LDL कोलेस्ट्रॉल आणि HDL कोलेस्ट्रॉल. एलडीएल कोलेस्ट्रॉल (बॅड कोलेस्ट्रॉल), तर एचडीएल कोलेस्ट्रॉल (गूड कोलेस्ट्रॉल).

उत्तम आरोग्यासाठी एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे आणि एचडीएल कोलेस्टेरॉलची कमी झालेली पातळी वाढवणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला 5 ड्राय फ्रूट्सबद्दल माहिती देणार आहोत, जे भिजवून खाल्ल्यानंतर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम असते. अक्रोड शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या उद्भवतात.

बदाम

बदाममध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रोटीन असते. बदाममध्ये असलेले अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचाच एक प्रकार आहे, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

High Cholesterol
Cholesterol Issue : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्या हे चमत्कारी पाणी, त्रास झटक्यात कमी होईल

मनुका

मनुक्यांमध्ये नैसर्गिक शर्करा असते जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याशिवाय बेदाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबर देखील असते. (health)

काजू

काजूमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असते. काजूमध्ये असलेल्या अनेक गुणधर्मांमुळे ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

High Cholesterol
Dry Fruit For Summer : उन्हाळ्यासाठी बेस्टम् बेस्ट आहेत हे ड्रायफ्रूट्स, शरीराला ठेवतील थंडगार!

खारीक

खारकेमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, फायबर, अमिनो अॅसिड, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (Dry Fruits)

तुम्हाला सगळे ड्राय फ्रूट्स शक्य नसल्यास तुम्ही फक्त बदाम रोज रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुम्हाला त्याचे बरेच चांगले फायदे होईल. तुमची इम्युनिटी बूस्ट होण्याबरोबरच स्मरणशक्तीदेखील त्याने वाढते. (Lifestyle)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()