Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात 'या' हाय प्रोटिन पदार्थांचा करा समावेश

Weight Loss Tips : अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या रूटीनचे पालन करतात.
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal
Updated on

Weight Loss Tips : सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या कारणांमुळे लोकांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादी समस्यांची वाढ होत आहे.

आजकाल तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. मग, वजन कमी करण्यासाठी विविध व्यायामाचे प्रकार, योगा, वर्कआऊट आणि डाएट प्लॅन्सची मदत घेतली जाते.

खरे तर ज्याप्रमाणे सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर ऊर्जा देत राहतो, त्याप्रमाणे दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी त्यांच्या दिवसभर ठरलेल्या रूटीनचे पालन करतात. परतं, अनेकांना रात्रीची भूक काही नियंत्रित करता येत नाही, मग अनावश्यक पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे, वजन आणखी वाढते.

परंतु, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात उच्च प्रथिनांनी युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला तर तुमचे वजन नियंत्रित राहू शकते. या खाद्यपदार्थांमुळे तुमची भूक कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात, या हाय प्रोटिन खाद्यपदार्थांबद्दल, जे तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Weight Loss Tips
Weight Loss Tips : व्यायाम न करताच वजन कमी करायचेय? मग, आजपासूनच 'या' गोष्टी करा

ओट्स चीला

ओट्समध्ये उच्च प्रथिने आणि फायबर्सचा भरपूर समावेश आढळून येतो. त्यामुळे, ओट्स किंवा ओट्स चीलाचे सेवन केल्याने व्यक्तीला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात ओट्स चिला चटणीसोबत किंवा कोशिंबीरसोबत नक्कीच खाऊ शकता.

अंडी

प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्यांना ओळखले जाते. उच्च प्रथिने, जीवनसत्वे आणि हेल्दी फॅट्सने परिपूर्ण असलेली अंडी तुम्ही तुमच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नक्कीच समाविष्ट करू शकता. तुम्ही उकडलेली अंडी खाऊ शकता किंवा अंड्याची करी बनवून ही त्याचा आस्वाद घेऊ शकता.

पनीर भुर्जी

ज्या लोकांना मांसाहार करायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही पनीर भुर्जी उत्तम पर्याय आहे. शाकाहारी लोकांनी जर आहारात पनीर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला तर त्यांच्या शरीराला प्रथिने, फायबर्सचा पुरवठा होऊ शकेल आणि वजन ही नियंत्रित राहू शकेल.

प्रथिने आणि कॅल्शिअमने समृद्ध असलेली पनीर भुर्जी वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी आणि चवदार पर्याय असू शकतो.

Weight Loss Tips
Weight Loss Diet : वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे मेथी, पण कडवट मेथी खावी कशी?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com