Hina Khan : आश्रूंना वाट मोकळी करून देत हिना खानने स्वत: कापले केस, कॅन्सरचे निदान झाल्यावर केस का कापतात?

Hina Khan Hair Cut : काही दिवसांपूर्वी हिना खानने तिच्या पहिल्या केमोथेरपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता हिनाने केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Hina Khan
Hina Khanesakal
Updated on

Hina Khan :

अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. याची माहिती तिने स्वत: सोशल मिडियावर दिली होती. तिला थर्ड स्टेज ब्रेस्ट कॅन्सर झाला असून त्यावर ती उपचार घेत आहे. नुकतेच तिने स्वत:चे केस कापले. याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी हिना खानने तिच्या पहिल्या केमोथेरपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता हिनाने केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हिना स्वतःचे केस कापताना दिसत आहे. कॅन्सर झालेल्या प्रत्येक रुग्णांला केस का कापावे लागतात? त्यामागील कारण काय आहे आपण जाणून घेऊयात.

Hina Khan
Happy Birthday Hina Khan अभिनेत्री नव्हे तर हवाई सुंदरी व्हायचं होतं, रंग आडवा आला! नेहमीच तिला....

हिना खानने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुम्ही माझ्या आईची प्रार्थना ऐकत असाल, ती स्वतःला अशा गोष्टीसाठी तयार करत आहे ज्याचा विचार करण्याचे धाडस तिच्यात कधीच नव्हते. जेव्हा आपले हृदय तुटते तेव्हा आपल्या सर्वांकडे स्वतःला हाताळण्याचे साधन नसते...'.

हिना खानने या आजाराशी झुंजणाऱ्या सर्व महिलांना संदेश दिला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, 'माझ्यासारख्या या आजाराशी झुंजणाऱ्या सर्व महिलांना मी हे सांगू इच्छिते की, 'मला माहित आहे की हे खूप कठीण आहे, कारण आपले केस हे आपल्या डोक्यावरचा मुकुट असतात. जो आपण कधीच काढत नाही...'

Hina Khan
Hina Khan: ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री हिना खान करतीये गंभीर आजाराचा सामना; पोस्ट शेअर करत म्हणाली,"रमजानचे उपवास..."

पण जर तुम्ही अशी लढाई लढत असाल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अभिमान बाजूला ठेवावा लागत असेल, तर तुम्हाला हे करावे लागेल. तुमचा अभिमान आणि मुकुट काढून टाका. तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील… आणि मी जिंकायचे ठरवले आहे.

Hina Khan
Hina Khan: आधी हसली, मग रडली! कॅन्सरच्या लढ्यादरम्यान हिना खानने कापले केस; लेकीसाठी कळवळला आईचा जीव

हिनाला केस का कापावे लागले?

याचे कारण म्हणजे केमोथेरपी. केमोथेरपी ही कर्करोगाच्या उपचाराची प्रक्रिया आहे. ज्या दरम्यान रुग्ण केस गळू लागतात. केमोथेरपीमध्ये रेडिएशनमुळे कॅन्सरचे रुग्ण आधी कमी होऊ लागतात. केमोथेरपी दरम्यान सर्व केस पडत नाहीत.

पण स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी दरम्यान केस नक्कीच गळतात. केमोथेरपी उपचार कर्करोगाच्या औषधांचा विशिष्ट संयोजन वापरतो. यामुळेच सर्व केमोथेरपी रुग्णांचे केस झपाट्याने गळतात. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com