- डॉ. मालविका तांबे
हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलेले आहे. डोक्यावर तुळस घेऊन वारीच्या वेळी नाचायचे असेल किंवा कार्तिक महिन्यात तुळशीचं लग्न करायचं असलं तर तुळशीचे रोप आवश्यक असते. घराघरात बाल्कनीत बागेत आपल्याला तुळस पाहायला मिळते. आरोग्यदायी बाग घरात करायची असेल तर पहिला मान दिला जाईल तो तुळशीलाच.
तुळशीला इंग्रजीत ‘होली बेसिल’ म्हणतात, तसेच तिची गौरी, भूताग्नी, नागमाता अशी नावेही प्रसिद्ध आहेत. घराघरात मिळत असल्याने हिला ग्राम्या असेही म्हटले जाते, चवीला उत्तम असल्यामुळे हिला सुरसा असेही म्हटले जाते. हिचे विष्णुवल्लभा व हरिप्रिया असेही नाव आहे कारण ही भगवान विष्णू व भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे.