First Cough Syrup : सगळं जग खोकून बेजार झालं होतं, 'अफू' मुळे मिळालं पहिलं कफ सिरप

गांबियातील मुलांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यापासून कफ सिरप खूप चर्चेत आहे.
First Cough Syrup
First Cough SyrupSakal
Updated on

First Cough Syrup : गांबियातील मुलांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यापासून कफ सिरप खूप चर्चेत आहे. या घटनेनंतर WHO ने देखील चार कफ सिरप बाबत अलर्ट जारी केला आहे.

First Cough Syrup
Dry Cough: वारंवार कोरडा खोकला होतोय? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

ज्या चार कफ सिरपबाबत डब्ल्यूएचओने अलर्ट जारी केला आहे. त्या कंपन्या मानकांची पूर्तता करत नसल्याचे म्हटले आहे. आरोग्य संघटनेच्या अलर्टनंतर हे कफ सिरप बनवाणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे.

कफ सिरपवरून वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. जगातील पहिल्या खोकल्याच्या सिरपबद्दलही बराच वाद झाला होता. आज आम्ही तुम्हाला जगातील पहिले कफ सिरप कसे बनवले गेले आणि त्यापूर्वी खोकल्यावर कशा पद्धतीने उपचार केले जात होते याबाबत माहिती सांगणार आहोत.

First Cough Syrup
Kaala Dhaga : सावधान! 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

असे बनवण्यात आले जगातील पहिले कफ सिरप

जगातील पहिले कफ सिरप 127 वर्षांपूर्वी जर्मन कंपनी बायरने बनवले होते, ज्याचे नाव हेरॉइन असे होते. हे सिरप बनवण्यासाठी अ‍ॅस्पिरिन औषधाचा वापर करण्यात आला होता. परंतु. हे औषध बनवण्यापूर्वी खोकल्यावर उपचारासाठी अफूचा वापर केला जात असे. याचे सेवन काहींसाठी धोकादायक ठरले कारण शरिरात गेल्यानंतर ते मॉर्फिन होत असे. तर, काहींना याचे व्यसन जडले.

First Cough Syrup
Harms of mouthwash: रोज रोज माउथवॉश करणं तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक!

असा झाला होता वाद

अफूचा वापर प्राचीन इजिप्तमध्ये खोकल्यासह अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात असे. येथून सिरप बनवण्याची कल्पना बायर कंपनीला सुचली. जेव्हा मॉर्फिन गरम केले जाते तेव्हा डायसेटिलमॉर्फिन तयार होते. ज्यामुळे खोकला आणि इतर सिरप पिल्यानंतर अनेकांना झोप येत असे. हीच बाब हेरत कंपनीने जगातील पहिले कफ सिरप बाजारात आणले.

हे सिरप ज्यावेळी बाजारात आले त्यावेळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सिरपने लोकांचा खोकला तर, बरा झालाच पण, ज्यांना क्षयरोग किंवा ब्राँकायटिस सारखा आजारा आहे त्यालाही आराम मिळाला.

First Cough Syrup
Health Tips : आजारतून सुटका करण्यासाठी महागड्या औषधांपेक्षा जेवणात करा तांब्या- पितळच्या भांड्याचा समावेश

ज्या लोकांना अफूचे व्यसन होते अशा लोकांची सवय सुटावी म्हणून डॉक्टरही रुग्णांना हे सिरप देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1899 नंतर लोकांनी त्यांना हेरॉइनचे व्यसन लागल्याचे सांगितले. त्यानंतर वाद वाढत गेला आणि शेवटी 1913 मध्ये बायरला या कफ सिरपचे उत्पादन थांबवावे लागले.

भारतात असे होत असे खोकल्यावर उपचार

ज्यावेळी खोकल्यावर कोणतेही औषध नव्हते त्यावेळी भारतात आयुर्वेद उपचार आघाडीवर होते. त्यामुळे त्याकाळी आले, काळी मिरी आणि तुळस यांसारख्या नैसर्गिक घटकांसह विविध आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून कफ सिरप तयार केले जात असे. तर, युरोप, अमेरिका आणि इजिप्तमध्ये खोकला बरा करण्यासाठी अफू, हेरॉईन, मॉर्फिनचा वापर होत असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.