कधी कधी आपण न बघता चालत राहतो आणि एखादा खड्डा समोर येतो आणि आपण खाली पडतो. अनेक वेळा पडल्यामुळे पाठीला तीव्र वेदना होतात. अशा परिस्थितीत दुखापत गंभीर असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जाणे चांगले आहे, परंतु जर तुम्हाला वाटत असेल की ही दुखापत किरकोळ आहे आणि ती घरीच बरी होऊ शकते. काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही वेदनांपासून आराम मिळवू शकता.
हेल्थलाइनच्या मते, पाठीच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. गंभीर दुखापत झाल्यास, पाठीचा कणा, लिगामेंट किंवा सॉफ्ट टिश्यू फाटण्याचा धोका असू शकतो, पण जर तुम्हाला वाटत असेल की दुखणे फक्त स्नायूंमध्ये आहे किंवा ही एक सामान्य दुखापत आहे, तर दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही घरीच त्यावर उपाय करून दुखण्यापासून आराम मिळवू शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
दुखण्यापासून अशा प्रकारे आराम मिळवा
कोल्ड थेरपी
पाठीला दुखापत होताच ताबडतोब फ्रीजमधून बर्फाचा पॅक आणा आणि पाठीवर लावा. अशाप्रकारे आजूबाजूच्या भागात सुन्नपणा येईल ज्यामुळे सूज येण्याची समस्या होणार नाही.
हिट थेरेपी
जर एक दिवसानंतरही वेदना होत असेल तर यानंतर तुम्ही गरम पाण्याने शेक द्यावा. यामुळे रक्त प्रवाह वाढेल आणि स्नायूंना आराम मिळेल. यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करा.
मलम लावा
दुखापत झालेली जागा जास्त न हलवता घरी उपलब्ध असलेला मलम लावा. हे लक्षात ठेवा की ते लावल्यानंतर, जास्त चोळू नका. मलम लावल्यानंतर कंबर चांगली झाकून घ्यावी. असे केल्याने तुम्हाला आराम वाटेल.
कोमट पाणी
जर तुमच्या कंबरेला लवकर आराम हवा असेल तर कोमट पाणी एका टबमध्ये ठेवा आणि त्यात अर्धा कप मीठ घाला. मग हळू हळू त्यात बसण्याचा प्रयत्न करा. जर बाथ टब असेल तर त्यात १५ मिनिटे झोपा. अशा प्रकारे तुम्हाला आराम मिळेल.
सरळ झोपा
जर दुखापत जास्त असेल तर बेडवर सरळ झोपणे चांगले. तासाभरानंतरही पाठ दुखत असेल किंवा हालचाल करण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.