Mouth Ulcers: वारंवार तोंड येण्याच्या समस्येने तुम्ही देखील त्रस्त आहात, पान खाल्ल्याने सुटतील तोंडाच्या सर्व समस्या

Mouth Ulcers Home Remedy: तोंड आल्यावर पानाचं सेवन उपयुक्त ठरु शकतं. नागवेलीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे तोंडातील जखमा लवकर भरुन निघण्यास मदत होते
Mouth Ulcers Home Remedy
Mouth Ulcers Home RemedyEsakal
Updated on

Mouth Ulcers Home Remedy: भारतात अनेक ठिकाणी जेवल्यानंतर पान खाल्ल जातं. पान Paan हे मुखशुद्धीसाठी तर खाल्ल जातचं शिवाय. पानाचे अनेक फायदे आहेत. पानामुळे तोंडाच्या Mouth अनेक समस्या दूर होतात. तसचं पचन कार्य सुधारुन पोटाच्याही समस्य़ा दूर होतात.

पानाचे विविध प्रकार पानाच्या टपऱ्यांवर पाहायला मिळतात. यात गोड पान, साधं पान, मसाला पान असे प्रकार पाहायला मिळतात. Home Remedies in Marathi Paan to get rid of Mouth Ulcers

पान खाल्ल्याने हिरड्यांचं दुखणं, दात दुखी Tooth Ache तसचं श्वासातील दुर्गंधी अशा तोंड्याच्या oral care अनेक समस्या दूर होतात.

याशिवाय अनेकदा उन्हाळ्यात शरीरात उष्णाता वाढल्याने तसचं अपचनामुळे तोंडामध्ये फोड येणं Mouth Ulcers किंवा जखमा होणं अशा समस्या निर्माण होतात. या तोंड येणं असं म्हंटलं जातं. या समस्येमुळे खाण्यासाठी अडचण निर्माण होते. अनेकदा तर जास्त तोंड आल्याने पाणी पिणं देखील मुश्किल होतं. 

तोंड आल्यावर पानाचं सेवन उपयुक्त 

तोंड आल्यावर पानाचं सेवन उपयुक्त ठरु शकतं. नागवेलीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे तोंडातील जखमा लवकर भरुन निघण्यास मदत होते. benefits of betel leaves

पान हे थंड असल्याने तोंड आल्यावर तोंडात होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय ओरल हेल्दसाठी म्हणजे तोंड्याच्या आरोग्यासाठी पानाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. पाहुयात पान खाण्याचे काही इतर फायदे...

दात किडण्यापासून बचाव- पान खाण्याचे तोंडाच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अनेकदा जेवल्यानंतर तोंडामध्ये अन्नाचे कण शिल्लक राहतात. यासाठी चुळ भरणं गरजेचं आहे.

मात्र काही वेळी ते शक्य होत नाही. तर अनेकांना चुळ भरण्याची सवय नसते. दातांमध्ये अन्न अडकल्याने दाताला किड लागण्याची आणि दात किडण्याची शक्यता असते. 

हे देखिल पहा-

Mouth Ulcers Home Remedy
Wisdom Teeth : तुम्हाला माहितीये अक्कल दाढ का दुखते?

जेवणानंतर पान खाल्ल्याने ते माउथ फ्रेशनर म्हणून काम करतात. तसचं यातील अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे दाताना किड लागण्याची शक्यता कमी होते.

तोंडातील इंफेक्शनची समस्या दूर- पानाच्या सेवनामुळे तोंडातील इंफेक्शनचा धोका कमी होतो. यामुळे तोंडातील बॅक्टेरीया मरून इंफेक्शन दूर होतं. तसचं इंफेक्शमुळे तोंड येण्याची शक्यता कमी होते. Betel leaf for oral health 

श्वासातील दुर्गंधी होते दूर- पानामुळे श्वासातील दुर्गंधी दूर होते. खास करून जेवणानंतर मसाला पान खाल्ल्याने फ्रेश वाटतं. मसाला पानात बडीशेप, गुलकंद, धना डाळ असे घटक असतात. ज्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते. 

यासोबतच पानामध्ये डायबिटीजची समस्या कमी कऱण्यासाठी गरजेचे असलेले अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात. तसचं सूज कमी करणारे अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात यामुळे हिरड्यांची सूज कमी होते. तसचं पानामध्ये अँटी-कॅन्सर आणि अँटी अल्सर गुण उपलब्ध असतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.