Kitchen Ingredients: बाहेरच्या जेवणापेक्षा घरचं जेवण हे आरोग्यासाठी पौष्टीक असतं असं कायमच आपलं मत असतं. मात्र घरचे जेवण बनवण्याच्या किचमध्येच तुमच्या आरोग्याचे शत्रू दडले आहेत हे तुम्हाला माहितीये काय? किचनमधील काही गोष्टी तुमची किडनी आणि हृदयास धोकादायक ठरू शकतात. किचनमधील या गोष्टी कशा कोणत्या आणि कशा ओळखायच्या जाणून घ्या.
मैदा
लोक घरी छोले भटोरे किंवा समोसे बनवण्यासाठी मैद्याचा वापर करतात. या गोष्टी घरी बनवतात म्हणून त्या हेल्दी असतील असे त्यांचे मत असते. मात्र मैदा हा शरीरासाठी घातक असतो. अति प्रमाणात मैदा खाल्ल्याने हार्ट डिसीज, वजन वाढणे, हृदयविकार, पचनशक्ती कमी होणे शिवाय कँसरही होऊ शकतो.
तेल
उत्तर भारतात किचनमध्ये तेलाचा सर्वाधिक वापर होतो. पकोडे, फ्रेंच फ्राइजसाठी तेलाचा भरपूर वापर केला जातो. ऑयली फूडने हार्ट अटॅक, स्ट्रोक, डायबिटीज, हायपरटेंशन, लठ्ठपणा आणि कँसरचाही धोका वाढतो.
साखर
बाहेरची मिठाईच नाही तर तुमच्या किचनमध्ये असलेली साखरही तुमचं शुगर लेवल वाढवते. अतिगोड चहा, कॉफी, मिल्कशेक किंवा हलवा तुमचं डायबिटीजचं प्रमाण वाढवते. यामुळे तुमचं ब्लड प्रेशर, शरीरात सूजन येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
मीठ
मीठाचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जगातील बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मिठाचे सेवन करतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर अनियंत्रित होतं. तुमच्या ब्रेन आणि हृदयावरही त्याचा परिणाम होतो.
घरचे जेवण हेल्दी कसे बनवाल?
किचनमध्ये असलेला मैदा, तेल, मीठ, साखर तुमच्या शरीरासाठी अगदीच हानिकारक ठरत नाही. फक्त तुम्ही त्याचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा. शिवाय तुम्ही या पदार्थांवर ऑप्शनही शोधू शकता. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.