Homeopathic Medicine : उन्हाळ्यात होमिओपॅथिक औषधे फायदेशीर

उष्माघातापासून काळजी घ्यावी ः प्राथमिक उपचार महत्त्वाचे
Homeopathic medicines beneficial in summer heat stroke First aid is important
Homeopathic medicines beneficial in summer heat stroke First aid is importantesakal
Updated on

अहमदनगर : उन्हाळा सुरू झाला, की उष्माघाताची भीती अनेकांना असते. तसेच, त्वचेवर डाग पडू नये म्हणून पूर्ण हात झाकेल असे कापड, तोंडाला रुमाल बांधला जातो. असे करूनही काही व्यक्तींना उष्णतेचा त्रास होतो. त्यावर इतर उपचार आहेतच, तथापि, होमिओपॅथिक उपचार प्रभावी ठरत असल्याचे मत होमिओपॅथिक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

इतर उपचारांबरोबरच आरोग्य क्षेत्रात होमिओपॅथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या उपचारपद्धतीचा हवा तितकासा प्रचार लोकांपर्यंत झाला नाही. हे उपचार काही आजारांवर वेळखाऊ ठरू शकतात, मात्र अनेक असाध्य आजार बरे होतात, असे मत होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. प्रतिमा बोरा यांनी व्यक्त केले.

''होमिओपॅथिक औषधोपचाराचे महत्त्व, त्याचे उपयोग आणि आजारांवर होणारा परिणाम’ याविषयी डॉ. प्रतिमा बोरा मार्गदर्शन करतात. त्या सांगतात, की थंडी-ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच काळात आजार संपूर्णपणे बरा होतो; परंतु गंभीर आजार जीर्ण झाल्यावर आजाराचा गुंता वाढल्यानंतर मात्र रुग्ण आल्यास तो गुंता सोडवण्यात थोडा वेळ लागतो.

होमिओपॅथीने टॉन्सिलाइटिस, ॲपेंडिसायटिस, किडनी स्टोन, मूळव्याध, प्रोस्टेट, हर्निया, गर्भाशयाच्या गाठी, कॅन्सर यांसारखे, शस्त्रक्रिया करावे लागणारे अनेक आजार कोणतीही शस्त्रक्रिया न करता बरे केले जातात. आजार परत उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. या उपचारपद्धतीत अगदी लहान बाळांपासून, तसेच गर्भावस्थेमध्ये व वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास फार सोपे आहे.

घामोळ्या, त्वचेला येणाऱ्या पुळ्या यासाठी होमिओपॅथिक औषधोपचार विशेष प्रभावी ठरत आहेत. या औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत. उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठीही उपाययोजना करता येतात. त्यामुळे आजार होऊच नये, यासाठी उन्हाळ्यात आवश्यक काळजी घ्यायला हवी.

- डॉ. सचिन बोरा, होमिओपॅथिक तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.