होमिओपॅथी समज व गैरसमज

होमिओपॅथीबद्दल अनेक चांगली आणि वाईट मते आहेत; तसेच समज व गैरसमज आहेत. ते आपण आता पाहूया...
Homeopathy
Homeopathysakal
Updated on

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

होमिओपॅथीबद्दल अनेक चांगली आणि वाईट मते आहेत; तसेच समज व गैरसमज आहेत. ते आपण आता पाहूया...

गैरसमज : होमिओपॅथी औषधांमध्ये स्टिरॉइड असते.

वस्तुस्थिती : होमिओपॅथी औषधे निरनिराळे नैसर्गिक स्रोत-वनस्पती, प्राणी, खनिजे अशा साडेपाच हजार घटकांपासून बनवली जातात. त्यांच्यामध्ये मूळ स्रोतांचे रेणू नसून मूळ स्रोतांची फक्त ऊर्जा असते आणि ती आपल्या ऊर्जा शरीराला आवश्यक ते उत्तेजन देते.

गैरसमज : होमिओपॅथी हे pseudo science म्हणजे एका अर्थी थोतांड विज्ञान आहे.

वस्तुस्थिती : होमिओपॅथी कशी काम करते याबद्दल आधुनिक विज्ञानाच्या भाषेत कोणतेही ठोस पुरावे उपब्ध नसल्यामुळे होमिओपॅथीला थोतांड मानले जायचे; परंतु गेल्या चाळीस वर्षांपासून आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत मान्य होतील असे रिसर्च पेपर ग्रीसचे डॉ. जॉर्ज विथॉल्कास या दिग्गज वैद्यांनी प्रसिद्ध करत होमिओपॅथी कशी क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांतावर आधारित आहे हे सिद्ध केले आहे. आयआयटीमधील काही वैज्ञानिकांनीही होमिओपॅथीच्या औषधांचे पेशींवर होणाऱ्या परिणामांचे नॅनो एक्सरे प्राप्त करत मोठं पाऊल उचलले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होमिओपॅथी हे पुरावा-आधारित विज्ञान आहे हे सिद्ध होईल.

गैरसमज : होमिओपॅथीची औषधे खूप हळू/संथगतीने काम करतात व बरे व्हायला वेळ लागतो.

वस्तुस्थिती : आपल्याला आलीकडच्या काळात झटपट उपचारांची सवय लागली आहे. लवकर ताप कमी करणे, पोटदुखी, डोकेदुखी अर्ध्या तासात बंद करणे इत्यादी. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे होमिओपॅथी ही मुळावर काम करत असल्यामुळे काही वेळा आपल्या आजाराची लक्षणे नाहीशी व्हायला वेळ लागू शकतो; पण याचा अर्थ होमिओपॅथीची औषधे संथगतीने काम करतात, असा नसून तो आजार कायमचा आपल्या सिस्टिममधून बाहेर काढला जात आहे असा आहे.

याव्यतिरिक्त जुनाट आजार आपल्या शरीरामध्ये किती वर्षापासून आहे, आपली आरोग्याची पायरी (उदा., काहीजण जन्मापासून कमकुवत व नाजूक आरोग्य स्थितीमध्ये असतात त्यांच्यामध्ये निसर्गतः प्रतिकारशक्ती कमी असते), जीवनशैली कशी आहे इत्यादी गोष्टींंनुसार बरे होण्यासाठी लागणारा काळ अवलंबून आहे.

गैरसमज : सर्व होमिओपॅथी डॉक्टर व औषधे चांगली असतात.

वस्तुस्थिती : असे अजिबात नाही. होमिओपॅथीचे क्रीम, लोशन, टॉनिक आणि लक्षणांवर दिल्या जाणाऱ्या packaged गोळ्या (उदा. खास पिंपल्ससाठी असणारे औषध) ही सर्व औषधे होमिओपॅथीच्या मूळ सिद्धांतावर आधारीत नसतात. होमिओपॅथीचा सिद्धांत सांगतो, की पेशंटची प्रकृती, अवस्था आणि घटना बघून औषध द्यावे, फक्त लक्षणे बघून नाही, त्यामुळे एकसारखे औषध सर्वांनी घेऊ नये. तसे घेतल्यास हानिकारक ठरते.

चांगले वैद्य कमीत कमी औषध देऊन केवळ लक्षणे नाही, तर संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी औषध देतात व पुन्हा आपण त्या आजाराचा बळी पडू नये, आपला स्वभाव, पचनशक्ती, झोपेची क्वालिटी हे सर्व चांगले होईल अशा पद्धतीचे औषध देतात!

शेवट होमिओपॅथीमध्ये उल्लेखित सिद्धांत सांगून करते

चांगला वैद्य आणि चांगली औषधोपचार पद्धती ती असते जी माणसातील आजाराला नाही तर आजारातील माणसाला बरे करते.

त्यामुळे पुढच्या वेळी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेताना केवळ लक्षणे व आजार कमी झाला का, हे पाहण्यापेक्षा तुम्ही सर्वांगाने आरोग्यपूर्ण झालात का, याकडे लक्ष द्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.