Daily Salt Intake: दिवसभरात किती मीठ खावे, जाणून घ्या जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम

उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेमुळे आणि जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
Daily Salt Intake for healthy lifestyle
Daily Salt Intake for healthy lifestylesakal
Updated on

Daily Salt Intake: जेवणाची चव वाढवण्यासोबतच मीठ आपल्याला निरोगी ठेवण्यासही मदत करते. पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनचा धोकाही असू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मीठ मर्यादित प्रमाणातच वापरावे.

अशा परिस्थितीत दिवसात मीठ किती खावे असा प्रश्न पडतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पिझ्झा-बर्गरमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक आढळते. हे पदार्थ जास्त खाल्ल्याने आपल्या आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया दिवसभरात मीठ किती प्रमाणात सेवन करावे.

Daily Salt Intake for healthy lifestyle
How To Lower Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल रक्तात मिसळलंच नाही तर चिंता कशाला

एका दिवसात किती मीठ खावे? (How much salt is needed per day)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज फक्त 5 ग्रॅम पेक्षा कमी मीठ खावे. यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनेक उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, आहारातील सुमारे 75 टक्के मीठ प्रोसेस्ड फूड आणि बाहेर तयार केलेल्या अन्नातून येते.

जास्त मीठ खाण्याचे तोटे (salt disadvantages)

हृदयासाठी हानिकारक: दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाला हानी पोहोचू शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका असू शकतो.

Daily Salt Intake for healthy lifestyle
निरोगी राहण्यासाठी स्वयंपाकासाठी वापरा हे Healthy oil, हृदयासाठी देखील फायदेशीर

पचनाशी संबंधित समस्या: याशिवाय जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या असू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मीठाचे सेवन कमी करा.

किडनीच्या समस्या: मीठामुळे तुमच्या किडनीलाही समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते, ज्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होऊ लागतो. यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.