World Milk Day : दूधात विषारी यूरिया तर मिसळलेला नाही? लगेच 30 सेकंदात घरी असं चेक करा

घरी आणल्या जाणाऱ्या दूधात हे विषारी रयायन तर नाही ना याची खात्री घरीच करता यावी यासाठी FSSAI ने दूधाची क्वॉलिटी चेक करण्यासाठी एक पद्धत सांगितली आहे.
How To Check Milk Quality
How To Check Milk Quality esakal
Updated on

How To Check Milk Quality : यूरिया हे फार घातक रसायन आहे. त्याचे आपल्या शरीरावर फार गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र बऱ्याच काळापासून भेसळयुक्त दूधात सर्सास यूरियाचा वापर केला जातो. दूधाद्वारे हे रसायन तुमच्या पोटात गेल्यास तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो. तेव्हा तुमच्या घरी आणल्या जाणाऱ्या दूधात हे विषारी रयायन तर नाही ना याची खात्री घरीच करता यावी यासाठी FSSAI ने दूधाची क्वॉलिटी चेक करण्यासाठी एक पद्धत सांगितली आहे.

जवळपास प्रत्येक घरात रोज दूध ही महत्वाची गरज आहे. भारतात दूधाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र दूधाच्या उत्पादनापेक्षा त्याची मागणी अधिक असल्याने दूधाची भरपाई करणे कठीण होऊन बसते. मात्र असे असतानाही आपली दूधाची गरज कशी भागवली जाते याचा विचार तुम्ही कधी केलाय का?

दूध सगळीकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असण्यामागे मोठं कारण म्हणजे दूधातील भेसळ. कमी दूधात यूरिया, डिटर्जंट, शुगर, सॉल्ट, फॉर्मेलिन यांसारखे रयायन मिसळून त्याचे प्रमाण वाढवले जाते. याचा अर्थ आपल्यापैकी बरेच जण रोज भेसळयुक्त दूध पित असू असा होतो. तेव्हा तुमच्या दूधाची क्वॉलिटी घरीच कशी चेक करता येईल ते जाणून घेऊया. (Health)

How To Check Milk Quality
Milk Adulteration Case : सतीश शिंदेंना बीडच्या न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

यूरिया काय असते? त्याला दूधात का मिसळतात?

युरिया हे सेंद्रिय संयुग आहे. याचा रंग पांढरा असून तो पिकांच्या उत्पादनासाठी वापरला जातो. हे गंधहीन, विषारी आणि चवहीन रसायन आहे. ते दुधात मिसळल्याने दुधाचा रंग बदलत नाही. ते मिसळल्याने दूध घट्ट होते. मात्र FSSAI ने सांगितलेल्या पद्धतीने आपण आपल्या दुधात या विषारी पदार्थाची घरच्या घरी चाचणी करू शकता.

How To Check Milk Quality
Soya Milk Benefits: हाडांच्या मजबुतीपासून ते निरोगी हृदयासाठी सोया मिल्कचे चे फायदे

भेसळयुक्त दूध असे ओळखा

FSSA ने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे.

यूरियाचे शरीरावर होणारे साइड इफेक्ट्स

याचा उपयोग दुधातील फॅट वाढवण्यासाठी केला जातो. या रसायनाचे अनेक गंभीर साइड इफेक्ट्स आहेत. ते तुमच्या आतड्यांबरोबर तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते. लक्षात ठेवा की भेसळयुक्त दूध प्यायल्याने किडनीचे आजार, हृदयाशी संबंधित आजार, अवयवांचे नुकसान, कमी दृष्टी, कर्करोग आणि मृत्यूही होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.