Vitaminin B12 Difficiency : ब्लड टेस्ट न करता घरीच शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता कशी चेक कराल? इथे वाचा

एक्सपर्टच्या मते, भारतातील बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-12 आणि डी ची कमतरता आहे.
Vitaminin B12 Difficiency
Vitaminin B12 Difficiencyesakal
Updated on

Vitaminin B12 Difficiency : कोरोनाकाळानंतर व्हिटॅमिन्स, सप्लिमेंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे शब्द प्रचलित झाले. कोरोनानंतर लोक व्हिटॅमिन बी-12 आणि डी च्या करतरतेबाबत लोक सजग झालेत. एक्सपर्टच्या मते, भारतातील बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-12 आणि डी ची कमतरता आहे.

हे दोन्ही व्हिटॅमिन्स शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. वयानुसार शरीरात या व्हिटॅमिन्सची कमतरता होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिटॅमिन्सची कमतरता झाल्यास त्याची लक्षणे लगेच कळून येत नाही. मात्र काही लक्षणे अशी असतात ज्यातून तुमच्यात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता झाल्याचे दिसून येते.

व्हिटॅमिन बी-12 शरीरात कसे तयार होते?

व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी फार महत्वाचे आहे. हे तुमच्या शरीरात डीएनए आणि रेड ब्लड सेल्स बनवण्याचे कार्य करते. मात्र मानवी शरीरात हे व्हिटॅमिन बी-12 तयार होत नाही. यासाठी तुम्हाला बाहेरील स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता झाल्यास डॉक्टर सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात. फोलेट किंवा व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता झाल्यास खालील लक्षणे दिसून येतात.

लक्षणे

दम लागणे किंवा छाती फुलून येणे

भूक न लागणे

हार्टबीट वाढणे

डोकेदुखी

दृष्टी कमजोर होणे

थकवा जाणवणे

डिप्रेशन किंवा एंझायटी फील होणे

Vitaminin B12 Difficiency
लहान मुलांमध्ये Vitamin D कमी आहे हे कसं ओळखायचं

करून घ्या या टेस्ट

वरील लक्षणे फार सामान्य आहेत. ही लक्षणे दिसल्यास तुम्ही व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता झालीये हे घरीच लक्षात येतं. तुम्हाला वरील कुठलेही लक्षणे दिसल्यास व्हिटॅमिन बी-12 ची टेस्ट करून घ्यावी. याशिवाय तुमची पंचवीशी पार झाली असेल तर तुम्ही रूटीनमध्ये व्हिटॅमिन बी-12 आणि डी ची टेस्ट करून घेऊ शकता. मात्र डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेऊ नका. (Health)

Vitaminin B12 Difficiency
Vitamin B12 ची कमतरता झाल्यास कोणते आजार होतात?

व्हेजिटेरियन सोर्स

शरीरात कुठल्याही मायक्रोन्यूट्रिएंट्सची कमतरता झाल्यास सप्लिमेंट्स ऐवजी नैसर्गिक पदार्थ बेस्ट सोर्स ठरतील. दूध, लो फॅट, योगर्ट,चीज किंवा पनीरमधून तुम्ही बी-12 मिळू शकतं. याशिवाय अंडी, शिटेक मशरूम, फोर्टिफाइड अन्नाने बी-12 कमतरता भरून काढली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.