Post Weight Loss : वजन कमी केल्यावर जास्त भूक लागते? मग, कंट्रोल करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

वजन कमी केल्यानंतर ते टिकवून ठेवणे हे अवघड काम असते.
Post Weight Loss  hunger
Post Weight Loss hungeresakal
Updated on

Post Weight Loss Hunger : वजन कमी करणे हे काही सोपे काम नाही यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. कित्येक तास घाम गाळल्यानंतर आणि योग्य आहाराचे व्यवस्थापन केल्यानंतर कुठेतरी वजन कमी करता येते.

बरं एकदा वजन कमी केल्यानंतर ते टिकवून ठेवणे हे देखील मोठे जिकीरीचे काम आहे. वजन कमी केल्यानंतर थोड्या निष्काळजीपणामुळे वजन पुन्हा वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे, या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.

परंतु, अनेकदा काही लोकांच्या बाबतीत असे होते की, वजन कमी केल्यानंतर त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आस लागते. जसे की, त्यांना काहीना काही खावेसे वाटते. यालाच वजन कमी केल्यानंतरची भूक (Post Weight Loss Hunger) असे म्हणतात. याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी आज आम्ही काही टीप्स सांगणार आहोत.

वजन कमी केल्यानंतर जास्त भूक लागण्यामागचे कारण कोणते ?

एका संशोधनानुसार, वजन कमी करताना पोटात घरेलिन हार्मोन जास्त प्रमाणात बाहेर पडतो, ज्यामुळे भूक लागते. जेव्हा जास्त वजन कमी होते, तेव्हा शरीरात घरेलीन हार्मोनची पातळी वाढते आणि एखाद्याला जास्त भूक लागते. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतरही भूक लागते.

पोस्ट वेटलॉस हंगरच्या संदर्भात एक संशोधन करण्यात आले आहे. त्या संधोधनानुसार, वजन कमी करताना पोटात ग्रेलिन नावाचे हार्मोन जास्त प्रमाणात बाहेर पडते. ज्यामुळे, जास्त प्रमाणात भूक लागते.

Post Weight Loss  hunger
Weight loss : वाढत्या वयामुळे महिलांना वजन कमी करण्यास अडचणी; काय आहेत या मागची कारणे? घ्या जाणून

जेव्हा जास्त वजन कमी होते किंवा केले जाते तेव्हा शरीरातील ग्रेलिन हार्मोनची पातळी जास्त प्रमाणात वाढते. ही पातळी वाढली की, जास्त प्रमाणात भूक लागते. ही भूक इतकी विचित्र असते की, जेवण केल्यानंतरही काहींना पुन्हा भूक लागते.

वजन कमी केल्यानंतर भूक लागली तर त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे ?

  • मुख्य म्हणजे जेवणाची आणि नाश्त्याची वेळ पाळली पाहिजे.

  • तुमच्या आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण संतुलित असायला हवे.

  • पाण्याच्या कमतरेमुळे ही भूक लागू शकते. त्यामुळे, पाणी भरपूर प्या.

  • भूक जास्त लागली तर तेव्हा हेल्दी स्नॅक्स खा.

  • अनेकदा काही जण रात्रीचे जागरण करतात, त्यामुळे, भूक लागते. या गोष्टीवर ही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा.

  • आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आवर्जून समावेश करा.

Post Weight Loss  hunger
Weight Loss Tips : शरीराचे वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग या गोष्टी फॉलो केल्यास नाही वाढणार वजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.