COVID-19 vs Allergy: असा ओळखा अ‍ॅलर्जी अन् कोरोना लक्षणांमधील फरक

जरी दोन्ही स्थितींमध्ये, श्वसन प्रणालीवर प्रामुख्याने परिणाम होत असला तरी कोरोना आणि अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमध्ये काही फरक आहेत.
COVID-19 vs Allergy:
COVID-19 vs Allergy:सकाळ डिजिटल टीम
Updated on

कोरोना आणि हंगामी अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमधील फरक : बऱ्याचदा कोरोनाची लक्षणे आणि हंगामी अ‍ॅलर्जीमध्ये बऱ्याच गोष्टी साम्य दिसतात. जरी या दोन गोष्टींमध्ये कारणे वेगवेगळी असली तरी त्यातील काही लक्षणे इतकी समान आहे की ज्यामुळे आपल्याला फरक करणे कठीण होते. कधी कधी अ‍ॅलर्जी समजून उपचार घेण्यास आपण उशीर करतो आणि त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गाबाबत धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. वर्षभर अ‍ॅलर्जी असणे सामान्य गोष्ट आहे, परंतु आता आपण वसंत मध्ये प्रवेश करत आहोत. जोखीम अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे लक्षणांबाबत थोडे अधिक जागरूक होण्याची गरज आहे. दोन स्थिती कशा वेगळ्या आहेत हे समजून घेण्याची वेळ आहे जेणेकरून आपण योग्य वेळी योग्य काळजी घेऊ शकणार. (difference between corona and allergy)

कोरोना आणि हंगामी अ‍ॅलर्जीचे कारणे : कोरोना हा विषाणूमुळे होणारा श्वसनचा संसर्ग आहे.अ‍ॅलर्जी हा शब्द ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ ‘न मानवणे’ असा होतो. सर्वसामान्य लोकसंख्येला ज्या वातावरणाचा, अन्नपदार्थांचा किंवा रसायनांचा त्रास होत नाही त्याचा त्रास होणे, याला आपण अ‍ॅलर्जी म्हणू शकतो. एकूण लोकसंख्येतील २० टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असतेच. पण ही गोष्ट झाली ज्यांना नेमकी कशाची अ‍ॅलर्जी आहे ते माहिती होणाऱ्यांची. एखाद्या गोष्टीची आपल्याला अ‍ॅलर्जी आहे, याची बहुसंख्यांना आयुष्यभर माहितीच नसते.

प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार असतात एक म्हणजे जन्मतः असलेली (innate immunity) आणि दुसरी मिळवलेली प्रतिकारशक्ती (acquired immunity). वाढत्या वयाबरोबर आपले शरीर परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकते. उदाहरणच द्यायचे झाल्यास विषाणूंमुळे होणारे संसर्ग लहानांना जितके होतात तितके मोठ्यांना होत नाहीत. या जडणघडणीच्या वयातच अ‍ॅलर्जी निर्माण होते. अगदी सामान्य भाषेत बोलायचे झाले तर अ‍ॅलर्जी म्हणजे एखाद्या पदार्थ किंवा परिस्थितीविषयी प्रतिकारशक्तीची असमर्थता होय. दोन्ही आजारांची कारणे वेगवेगळी असली तरी लक्षणे कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहेत.

COVID-19 vs Allergy:
CET परीक्षा अर्जप्रक्रिया आजपासून सुरू, मे-जूनमध्ये पेपर होणार

कोरोनाची लक्षणे : जरी कोरोनाव्हायरस हा श्वसनसंस्थेचा संसर्ग असला तरी त्याचा परिणाम बाकी अवयवांवर होतो. सुरुवातीची लक्षणे श्वसनसंस्थेशी संबंधित असतात परंतु विषाणू जसजसा वाढतो तसतसा तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू लागतो ज्यामुळे विविध लक्षणे दिसू लागतात. या लक्षणामध्ये श्वास भरुन येणे, न्यूमोनिया आणि अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते.

कोरोना संसर्गाची सामान्य लक्षणे :

१. थंडी वाजून ताप येणे

२. खोकला

३. अंग दुखी

४. डोकेदुखी

५. थकवा

६. चव न येणे

७. श्वास घेण्यास त्रास होणे

८. घसा खवखवणे

९. शिंका येणे

१०.डोळ्यांना खाज सुटणे किंवा पाणी येणे

११. नाक वाहणे

हंगामी अ‍ॅलर्जीचे लक्षणे : प्रतिकारशक्ती कमी झाल्याने दिसून येणारी लक्षणे खालीलप्रमाणे.

१.श्वास लागणे

२.कफ, शिंका येणे

३.नाक वाहणे

४.खवखवणारा घसा,

५.त्वचेवर पुरळ उठणे,

६. खाज येणे,

७. पित्ताची तक्रार,

८.रक्तदाब कमी होणे,

९ दम्याचा त्रास होणे,

लहान मुलांना अ‍ॅलर्जीचा त्रास असेल, तर त्यांच्या अंगावर वरचेवर पुरळ उठते, खाज येते, अनेकदा तापही येतो. विशिष्ट प्रकारच्या औषधांनंतर हा ताप निघून जातो, पुन्हा काही दिवसांनी येतो. या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.

COVID-19 vs Allergy:
धुळवडीला नाचताना स्वतःवरच चाकूनं वार, तरुणाचा मृत्यू

कोरोना आणि अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमधील फरक:

जरी दोन्ही स्थितींमध्ये, श्वसन प्रणालीवर प्रामुख्याने परिणाम होत असला तरी कोरोना आणि अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमध्ये काही फरक आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोना आणि हंगामी अ‍ॅलर्जी दोन्हीमुळे खोकला, डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. घसा खवखवणे, शिंका येणे, डोळे आणि घसा खाजणे ही देखील सामान्य लक्षणे आहेत.या दोन स्थितीतील विचार केला तर कोरोनामध्ये श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे सामान्य आहे परंतु त्या व्यक्तीला दमा असल्याशिवाय अ‍ॅलर्जीच्या बाबतीत ते दिसून येत नाही. शिवाय कोरोनात थंडी वाजून येणे आणि ताप अधिक सामान्य आहे.

कोरोना आणि अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमधील फरक:

जरी दोन्ही स्थितींमध्ये, श्वसन प्रणालीवर प्रामुख्याने परिणाम होत असला तरी कोरोना आणि अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमध्ये काही फरक आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोना आणि हंगामी अ‍ॅलर्जी दोन्हीमुळे खोकला, डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. घसा खवखवणे, शिंका येणे, डोळे आणि घसा खाजणे ही देखील सामान्य लक्षणे आहेत.या दोन स्थितीतील विचार केला तर कोरोनामध्ये श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे सामान्य आहे परंतु त्या व्यक्तीला दमा असल्याशिवाय अ‍ॅलर्जीच्या बाबतीत ते दिसून येत नाही. शिवाय कोरोनात थंडी वाजून येणे आणि ताप अधिक सामान्य आहे.

कोरोना आणि हंगामी अ‍ॅलर्जीपासून ही काळजी घ्या

कोरानासाठी सामाजिक अंतर राखणे, लसीकरण करणे, मास्क घालणे आणि योग्य स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जरी कोरोनाची प्रकरणे कमी झाली असली तरी सुरक्षित राहण्यासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी चाचणी आवश्यक आहे. या चाचणीमध्ये पुढे येणाऱ्या निकषावरून कोणता उपचार सुरू करायचा हे ठरते. बुरशी, झाडे, प्राणी, जीवाणू, विशिष्ट प्रकारचे वास अशा पाचशेहून अधिक अ‍ॅलर्जीचा यात समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()