Dandasana Benefits : पायांचे स्नायू मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे दंडासन, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Yoga Dandasana Benefits : पायांचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे.
Dandasana Benefits
Dandasana Benefitsesakal
Updated on

Dandasana Benefits : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. नियमितपणे योगासने केल्याने अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या दूर होऊ शकतात. योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो. या आसनांचा दररोज सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. या योगासनांपैकीच एक असलेले योगासन म्हणजे दंडासन होय.

दंडासनाला स्टाफ पोझ असे ही म्हटले जाते. हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. हे योगासन करताना व्यक्तीला त्याच्या पाठीचा मणका सरळ स्थितीमध्ये ठेवणे आवश्यक आहे. पायांचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. आज आपण दंडासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Dandasana Benefits
Yoga For Eye Health : डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या योग्य पद्धत

दंडासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत पाय पसरून बसा.

  • शक्य तितके पाय पुढे पसरवा.

  • आता तुमचे दोन्ही पाय एकत्र करून रिलॅक्स स्थितीमध्ये रहा.

  • या परिस्थितीमध्ये तुम्हाला पायांच्या आणि मांडीच्या स्नायूंमध्ये ताण जाणवेल.

  • त्यानंतर, हळूहळू तुमचे दोन्ही खांदे सरळ आणि ताठ स्थितीमध्ये ठेवा.

  • आता तुमच्या पाठीचा कणा देखील सरळ आणि ताठ स्थितीमध्ये ठेवा.

  • तुमच्या दोन्ही मांड्यांच्या बाजूला दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर ठेवा.

  • आता श्वास आत घ्या आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

  • आता काही सेकंद या स्थितीमध्ये रहा. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परत या.

  • जर तुम्हाला काही शारिरीक समस्या असेल तर हे योगासन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा योगातज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

दंडासन करण्याचे फायदे

  • दंडासनाचा नियमितपणे सराव केल्याने पाठीचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

  • दंडासनाचा दररोज सराव केल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात.

  • जर तुम्हाला पाठदुखी किंवा पाठीच्या कण्याच्या काही समस्या असतील तर या योगासनाचा सराव केल्याने फायदा होऊ शकतो.

  • या योगासनाचा दररोज सराव केल्याने पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि मेंदू शांत राहतो.

  • दंडासनाचा सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

    डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Dandasana Benefits
Anulom Vilom Pranayam : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रभावी आहे अनुलोम-विलोम प्राणायाम, दररोज करा सराव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.