Muscle Strength : ३ सोप्या उपायांनी स्नायू बळकट करा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा

फ्लूसह वाढते संसर्ग आणि जागतिक महासाथीचा अनुभव घेतला असल्‍यामुळे आपले आरोग्‍य उत्तम राखणे आणि रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ असणे अत्‍यंत महत्त्वाचे बनले आहे.
Muscle Strength
Muscle Strengthsakal
Updated on

मुंबई : आजच्‍या धावपळीच्‍या युगात आपण सतत धावपळ करतो आणि व्‍यग्र नित्‍यक्रमामध्‍ये गुंतून जात आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतो. फ्लूसह वाढते संसर्ग आणि जागतिक महासाथीचा अनुभव घेतला असल्‍यामुळे आपले आरोग्‍य उत्तम राखणे आणि रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ असणे अत्‍यंत महत्त्वाचे बनले आहे. (how to gain muscle strength how muscle strength help boost immunity )

अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायामधील मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख स्‍नायूंचे आरोग्‍य का महत्त्वाचे आहे आणि स्‍नायू शक्तिशाली असल्‍याने रोगप्रतिकाशक्‍ती कशाप्रकारे वाढू शकते याबाबत सांगत आहेत. हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Muscle Strength
Heart Attack : मधुमेह म्हणजे हृदयविकाराची सुरुवात तर नाही ना ? वेळीच तपासून घ्या

स्‍नायू आणि रोगप्रतिकारशक्‍ती निर्माण करण्‍यामध्‍ये त्‍यांची भूमिका

स्‍नायू उत्तम आरोग्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. स्‍नायूंमुळे आपल्‍याला हालचाल करण्‍यास आणि संतुलन राखण्‍यास मदत होते. खरेतर, ते तुमची शक्‍ती कायम राहण्‍यास मदत करण्‍यासोबत खेळ खेळणे, नृत्‍य करणे, कुत्र्यासोबत चालायला जाणे अशा कृती करण्‍याच्‍या तुमच्‍या क्षमतेला पाठबळ देखील देतात.

स्‍नायू रोगप्रतिकार पेशी कार्यान्वित करण्‍यामध्‍ये देखील महत्वाची भूमिका बजावतात. स्‍नायू उती रोगप्रतिकारशक्‍तीला कार्य करण्‍यास आवश्‍यक असलेली ऊर्जा व अॅमिनो आम्‍ल देण्‍यासोबत आपले संसर्गापासून संरक्षण देखील करतात.

खराब स्नायूंच्या आरोग्यामुळे चालणे किंवा खाणे यांसारख्या दैनंदिन क्रियांसह अगदी लहान क्रिया करत राहण्‍याच्‍या व्यक्तीच्या क्षमतेवर हळूहळू परिणाम होऊ शकतो.

Muscle Strength
Safe Motherhood : सुरक्षित मातृत्वासाठी गर्भधारणेपूर्वी या गोष्टी तपासून घ्या

स्‍नायूशक्‍ती वाढवता येऊ शकेल असे ३ सोपे मार्ग पुढीलप्रमाणे :

१. शारीरिक व्‍यायामासाठी वेळ काढा : नियमित शारीरिक व्‍यायामाचा स्‍नायूशक्‍ती मजबूत करण्‍याकरिता दीर्घकाळापर्यंत फायदा होऊ शकतो. तुम्‍ही तुमच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये चालणे, पोहणे, सायकल चालवणे, जॉगिंग किंवा पायऱ्या चढणे यांसारख्‍या साध्‍या कृतींचा समावेश करत सुरूवात करू शकता.

तसेच तुम्‍ही वजन उचलण्‍याचा आणि हळूहळू त्‍यामध्‍ये अधिक वजन वाढवण्‍याचा आणि काळासह हा व्‍यायाम वारंवार करण्‍याचा प्रयत्‍न करू शकता किंवा स्‍ट्रेच बॅण्‍डसह व्‍यायाम करू शकता.

नियमितपणे फक्‍त एक तास शारीरिक व्‍यायाम केल्‍यास स्‍नायूशक्‍ती आणि एकूण आरोग्‍य उत्तम मदत होऊ शकते. यामुळे संसर्गाविरोधात लढण्‍याची आणि घातक जीवाणूंना प्रभावीपणे नष्‍ट करण्‍याची शरीराची क्षमता देखील वाढू शकते.

२. दैनंदिन प्रथिने गरजांची पूर्तता करा : प्रथिने स्‍नायूशक्‍ती मजबूत करण्‍यासाठी आवश्‍यक आहेत आणि दररोज पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. प्रतिभोजन २५ ते ३० ग्रॅम प्रथिनांचे सेवन स्‍नायूशक्‍तीची निर्मिती आणि उती दुरुस्तीसाठी शरीराकरिता सानुकूल आहे.

तुम्‍ही लीन मांस, पोल्‍ट्री, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, टोफू आणि बीन्स यांसारख्या अनेक स्त्रोतांच्‍या माध्‍यमातून प्रथिने मिळवू शकता.

३. पौष्टिक घटकांची पूर्तता करा : चांगले पोषण आणि स्नायूंचे आरोग्य या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. अखेर अन्नातूनच तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते आणि स्नायूंना ताकद मिळते.

यासाठी प्रथिनांसह कॅल्शियम व जीवनसत्व ड असलेला आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यासाठी प्रथिनांव्‍यतिरिक्‍त तुम्‍ही हिरव्‍या पालेभाज्‍या, दुग्‍धजन्‍य उत्‍पादने, मासे, मशरूम्‍स व सोयाबीन यांचे देखील सेवन करू शकता.

तसेच, स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यासाठी शरीराला बीटा-हायड्रॉक्‍सी-बीटा-मीथाइलबुट्रायरेट (एचएमबी)ची गरज असते, जे शरीर विशिष्ट अमिनो आम्‍लांचे विघटन करते तेव्‍हा नैसर्गिकरित्‍या निर्माण होते. तुम्‍ही याचे प्रमाण कमी असलेले अॅवोकॅडो, द्राक्षे व फुलकोबी यांचे सेवन करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()