गेल्या काही वर्षांत लोकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाले आहेत, ज्याचा तुमच्या सामाजिक जीवनावर तसेच तुमच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: लठ्ठपणाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ज्याचा प्रभाव केवळ शरीरावरच नाही तर चेहऱ्यावरही दिसून येतो. परफेक्ट जॉलाइन आणि रेखीव चेहऱ्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक आणि सुंदर दिसता. मात्र मानेजवळ वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे तुमचं सौंदर्य पार बिघडून जाते.
डबल चिन आणि चेहऱ्यावरील चरबीमुळे त्यांचे सौंदर्य कमी होते असे लोकांना वाटते. अशा परिस्थितीत, लोक शरीरातील चरबी तसेच चेहऱ्यावरील चरबीपासून मुक्त होण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. योग्य टिप्सच्या मदतीने चेहऱ्यावर जमा झालेली चरबी दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया अशाच काही सोप्या टिप्सबद्दल.
नेक रोटेशन म्हणजे गोलाकार पद्धतीने मान हलवणे. यामध्ये सुरुवातीला क्लॉकवाईज आणि नंतर ॲण्टीक्लॉकवाईज पद्धतीने मान फिरवावी. यातही सुरुवातीला 3 वेळा हळूवार मान फिरवा आणि त्यानंतर पुढचे 2 वेळा थोडी जलद मान फिरवावी. हा व्यायाम केल्याने मान, गळा या भागातील रक्ताभिसरण तर वाढतेच पण तेथील वेगवेगळ्या ग्रंथींचे कार्यही सुधारते
जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल, तर तुम्हाला सकाळी उठून मसाज करावा लागेल. उभे असताना किंवा बसून 2 ते 3 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. कपाळापासून मसाज सुरू करा आणि नंतर हळूहळू गालावरून मानेपर्यंत जा.
गोड पदार्थ हे नेहमीच आरोग्यासाठी धोकादायक मानले गेले आहेत. त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील चरबी नाहीशी करायची असेल तर तुम्हाला गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करावे लागेल.