Eye Protection Tips : कडक उन्हाळ्यात सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

Eye Protection Tips : सध्या देशातील अनेक भागांमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत.
Eye Protection Tips
Eye Protection Tipsesakal
Updated on

Eye Protection Tips : सध्या देशातील अनेक भागांमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. या दिवसांमध्ये आरोग्याची आणि खास करून त्वचेची, डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तीव्र उन्हाचा फटका त्वचेला आणि डोळ्यांनाही पोहोचतो. उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रिन लावू शकता.

तीव्र उन्हामध्ये अतिनील किरणांचा (UV Rays) समावेश असतो. हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा प्रकार आहे, जो त्याच्या लहान तरंगलहरींमुळे आपल्याला दिसत नाही. परंतु, ही किरणे डोळ्यांच्या ऊतीमध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे, डोळ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये डोळ्यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. ही काळजी कशी घ्यायची? त्याबद्दलच्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत.

Eye Protection Tips
Summer Health : कडाक्याच्या उन्हातून आल्यावर किती वेळाने पाणी प्यावे? तज्ज्ञ सांगतात की...

सूर्याकडे थेट पाहू नका

सूर्याकडे थेट पाहिल्याने डोळ्यांचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे, सूर्याकडे थेट पाहणे टाळा. जर तुम्ही पाहिले तर डोळ्यांना मॅक्युलर होल आणि रेटिनोपॅथीसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, डोळ्यांची काळजी घ्या आणि सूर्याकडे अजिबात पाहू नका.

सनग्लासेसचा वापर करा

सूर्याच्या तीव्र अतिनील किरणांपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी डोळ्यांमध्ये सनग्लासेस घाला. महत्वाची बाब म्हणजे सनग्लासेस खरेदी करताना ते आपल्या डोळ्यांना UV संरक्षण देतात का? किंवा त्याला UV400 चे लेबल आहे का?  हे तपासून घ्या. जर हे असेल तरच सनग्लासेस खरेदी करा.

जर तुम्ही चष्मा घालत असाल तर तुम्ही ट्रांन्झिशन किंवा फोटोक्रोमॅटिक लेन्सची निवड करू शकता. यामुळे, तुमच्या डोळ्यांचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होऊ शकेल.

डोक्यावर टोपी घाला

जर तुम्ही उन्हात बाहेर जाणार असाल तर डोक्यावर टोपी घाला. यामुळे, सूर्यकिरणे थेट तुमच्या डोळ्यांवर पडणार नाहीत. शक्यतो रूंद काठ असलेल्या टोपीची निवड करा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अशा सर्व साईजमध्ये तुम्हाला टोप्या किंवा हॅट्स मिळतील. त्यांचा अवश्य वापर करा. सनग्लासेससोबत टोपी घातल्याने सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे आणि चेहऱ्याचे संरक्षण होईल.

Eye Protection Tips
Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.