मुलं अगदी लहान असताना रात्री अंथरुणात लघवी करणं Bed wetting ही सामान्य गोष्ट आहे. यासाठीच अलिकडे अनेक पालक Parents लहान मुलांना म्हणजेच साधारण ३ वर्षापर्यंत डायपर घालतात. How to stop night Bed wetting of your grown up children
मात्र मुलं एकदा का ३ वर्षांहून मोठी झाली की ती स्पष्ट बोलू लागल्याने किंवा काही वेळेस आपल्या आईला समजतील अशा बोबड्या बोलात का होईना पण त्याना लघवीला Urine आल्याचं आपल्या आईला सांगतात. तसंच रात्री अथरुणात लघवी करणं बंद Night Bed Wetting Disorder करतात.
मात्र काहीवेळा मुलं Kids ७-८ वर्षांची झाली तरी रात्री अंथरुणात लघवी करतात. काही मुलांची ही रोजची समस्या असते. तर काही मुलं अधूनमधून अंथरुण ओलं करतात. अशावेळी मात्र पालकांची चिंता वाढू लागते.
अंथरुणात लघवी केल्यास मुलांना ओरडू नये
मुलं मोठी झाल्यानंतरही अंथरुणात लघवी करण्यामागे वेगवेगळी कारणं असतात. मात्र त्यांच्या या कृतीसाठी आई वडिलांनी किंवा कुटुंबियांनी त्याना ओरडा देऊ नये. यामुळे मुलांच्या मनावर मानसिक परिणाम होऊ शकतो. ओरडा मिळाल्याने मुलांवर दबाव निर्माण होवून काही वेळा ही समस्या कमी होण्याएवजी आणखी वाढू शकते.
तसचं चारचौघात मुलांच्या या कृतीची थट्टा देखील करू नये. यामुळे त्यांना नैराश्य येऊ शकतं. ते इतरांमध्ये मिसळण्यास घाबरू लागतील. म्हणूनच त्यांची ही सवय मोडण्यासाठी काही घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. मात्र त्याआधी यामागची कारण जाणून घेऊयात
हे देखिल वाचा-
या कारणांमुळे मुलं अंथरुण ओलं करतात
- लहान मुलांचं मूत्राशय हे मोठ्यांच्या तुलनेत लहान असतं. त्यामुळे त्यांना जास्त काळ लघवी रोखणं शक्य होत नाही आणि ते अंथरुणातच लघवी करतात.
- रात्री अगदी गाढ झोपेत असल्याने ते असं करू शकतात.
- बद्धकोष्ठता हे देखील यामागचं कारण असू शकतं.
- अनुवांशिक कारणं
- नाका संबंधीच्या समस्या
- मूत्राशयाच्या नियंत्रणामध्ये अडचण
- रात्री उशीरा झोपण्यापूर्वी पाणी पिणं किंवा इतर पेय पिणं
मुलांची अंथरूण ओलं करण्याची सवय मोडण्यासाठी घरगुती उपाय
१. आवळा- आवळ्यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबत त्यांची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
आवळा हे मूत्राशय किंवा आतड्यांमधील संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रात्री झोपेत अचानक लघवी येण्याची समस्या दूर होते. यासाठी मुलांना एक ग्लास कोमट पाण्यात आवळा पावडर आणि चिमूटभर काळीमिरी पूड टाकून हा काढा दररोज पिण्यास द्यावा. यामुळे काही दिवसांमध्येच अंथरूण ओलं करण्याची समस्या दूर होईल.
२. दूध आणि गुळ- अनेकदा थंडीमुळे देखील मुलं अथरुणात लघवी करतात. यासाठीच शरीरात गरमी रहावी यासाठी गूळ फायदेशीर ठरू शकतं. यासाठी मुलांना दररोज सकाळी कोमट दूधासोबत थोडं गुळ खाण्यास द्यावं. गुळामध्ये आयर्नचं प्रमाणही चांगलं असल्याने मुलांच्या पोटाच्या समस्या देखील दूर होतात.
३. खारिक- खारिक हे लहान मुलांच्या वाढीच्या अवस्थेत त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसंच अथरुणात लघवी करण्याची मुलांची सवय मोडण्यासाठी देखील खारिक उपयुक्त ठरते. यासाठी मुलांना झोपण्यापूर्वी २-३ खारका खाण्यासाठी द्या. यानंतर मात्र त्यांना जास्त पाणी पिण्यास देऊ नका.
हे देखिल वाचा-
४. जायफळ- मुलांची अंथरूण ओलं करण्याची समस्या दूर करण्यासाठी त्यांना दररोज सकाळ आणि संध्याकाळ दूधामध्ये जायफळ घालून पिण्यास द्या. रात्री अगदी झोपण्यापूर्वी हे दूध देऊ नका.
५. द्राक्षाचा रस- मुलांना रात्री झोपेत लघवी करण्याची सवय मोडायची असेल तर त्यांना द्राक्षाचा रस द्यावा. यामुळे देखील फरक पडेल.
६. केळं- मुलं रोज रात्री अंथरुण ओलं करत असेल तर त्याला दिवसातून २ तरी केळी खाण्यास द्या. यासोबतच तुम्ही अर्धा कप आवळ्याच्या रसात अर्ध केळ कुस्करून त्यात थोडी साखर मिसळून मुलांना पिण्यास द्यावं. यामुळे वारंवार लघवी येण्याची त्यांची समस्या कमी होईल.
अशा प्रकारे तुम्ही काही घरगुती उपाय करून मुलांची रात्री झोपेमध्ये लघवी करण्याची सवय मोडू शकता. यासोबत मुलांना रात्री अंथरुणात जाण्यापूर्वी बाथरुमला जाण्याची सवय लावा. त्याचप्रमाणे रात्री झोप मोडल्यास पुन्हा लघवीला जाण्याची सवय लावा.
मुलांना रात्री उशीरा कोणताही पदार्थ किंवा पेय देऊ नका. या उपायंनीदेखील मुलांची ही समस्या कमी न झाल्यास चिंता करण्याएवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.