Skin Care-Monsson Tips : कीटक दंश झाल्यास घाबरू नका, लगेच करा हे घरगुती उपाय

विविध कीटक चावल्याने तुम्हाला विविध त्रास होवू शकतात. काही वेळेस त्वचेवर रॅश येऊ शकते. Bug Bite Remedies काही कीटक चावल्याने त्वचेवर जळजळ होते तर काहीवेळेस रॅश येऊ शकतो. काही किडे चावल्याने सूज येऊन खाज येणं किंवा वेदना होणं असाही त्रास होवू शकतो
पावसाळ्यात किटक दंश
पावसाळ्यात किटक दंशEsakal
Updated on

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किटकांची आणि किड्यांची Bugs संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अगदी घरात असो किंवा बस, ट्रेन, ऑफिसमध्ये तुम्हाला एखादा किडा तुम्हाला चावू शकतो. How to treat Bug Bite during Monsson Season

तसंच तुमच्या वाळत घातलेल्या कपड्यांमध्ये Clothes देखील एखादा किडा किंवा कीटक दडून बसू शकतो जो तुम्हाला कपडे घातल्यानंतर चावू शकतो. बऱ्यादचा पावसाळी पिकनीक म्हणजेच धबधबे किंवा दऱ्या खोऱ्यात ट्रेकिंग करतानाही एखादा कीटक चावण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात असंख्य प्रजातींच्या किटकांचा वावर वाढलेला असतो.

अशात विविध कीटक चावल्याने तुम्हाला विविध त्रास होवू शकतात. काही वेळेस त्वचेवर रॅश येऊ शकते. Bug Bite Remedies काही कीटक चावल्याने त्वचेवर जळजळ होते तर काहीवेळेस रॅश येऊ शकतो. काही किडे चावल्याने सूज येऊन खाज येणं किंवा वेदना होणं असाही त्रास होवू शकतो.

यासाठीच एखादा किडा किंवा कीटक चावताच तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

डंख काढण्याचे उपाय-

अनेक किडे-कीटक त्वचेवर डंख मारून तो त्वचेत सोडतात. यामुळे जळजळ होते आणि इंफेक्शन होवू शकतं. यासाठीच सर्वप्रथम डंख काढणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही एखादी चावी, कार्ड किंवा ब्रश तसंच सेलो टेपच्या मदतीने डंख काढू शकता.

चावी किंवा कार्ड सारखी वस्तू डंक मारलेल्या ठिकाणी घासल्याने डंख निघू शकतो. तसंच तुम्ही सेलो टेपची ट्रिक वापरू शकता. यासाठी डंख मारलेल्या ठिकाणी सेलो टेप चांगली चिटकवावी आणि ती जोरात ओढावी. डंक निघाल्यानंतर त्वचा स्वच्छ साबणाने धुवावी. डंक निघाल्याने इंफेक्शन किंवा विषारी द्रव पसरण्याचा धोका कमी होतो. Monsoon Health care

हे देखिल वाचा-

पावसाळ्यात किटक दंश
पावसात भिजल्याने सुटते सारखी खाज? करा हा घरगुती उपाय Itching Remedies

किडा चावल्यास हे पदार्थ येतील उपयोगी

किडा किंवा कीटक चावल्यावर होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टींचा वापर करू शकता.

किडा चावल्यास त्या जागी बर्फ लावा. यामुळे रक्त गार झाल्याने विष पसरण्याचा धोका टळतो. तसंच सूज येत नाही आणि जळजळ होत असल्यास ती कमी होण्यास मदत होते.

कोरफड लावल्याने डंखाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

जर किडा किंवा कीटक चावलेल्या ठिकाणी खाज येत असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये थोडं पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट किडा चावलेल्या भागावर लावा.

तसंच तुम्ही किडा चावलेल्या भागावर कांद्याच्या स्लाइसने स्क्रब करू शकता. कांद्यातील सल्फर कंपाउंडमुळे डंखातील विष पसरत नाही. यामुळे खाज आणि जळजळ कमी होते. तसंच कोळी चावल्यावरही तुम्ही हा उपाय करू शकता.

किडा चावलेल्या ठिकाणी मध लावू शकता. मधामध्ये एंटिसेप्टिक गुणधर्म असल्याने आराम मिळतो.

किडा चावल्यास त्या भागावर लिंबाने स्क्रब करा. लिंबातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे डंकाचा प्रभाव कमी होतो. तसंच विष पसरण्याचा किंवा इंफेक्शन वाढण्याचा धोका कमी होतो.

तसंच मच्छर चावल्यामुळे तुम्हाला फोड येवून खाज येत असेल तर तुम्ही तुळशीचं पान हाताने चुरडून ते प्रभावित भागावर लावू शकता.

अशा प्रकारे एखादा किडा किंवा कीटक चावल्यावर तुम्ही घरच्या घरी काही प्राथमिक उपाय करू शकता. अर्थात जर तुम्हाला काही गंभीर परिणाम दिसून येत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

पावसाळ्यात किटक दंश
Itchy Scalp: अशी घालवा डोक्याची खाज; खास घरगुती उपाय तुमच्यासाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.