Human Brain : माणसाचा मेंदू किती GB चा असतो माहितीये? जाणून घ्या

मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा भाग आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीर नियंत्रित होते.
Human Brain
Human Brainesakal
Updated on

How Many GB Human Brain is : मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा भाग आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीर नियंत्रित होते. जेवढे आपण मेंदूचे व्यायाम करतो तेवढी मेंदूची क्षमता वाढते. जर मेंदूच्या क्षमतेचा योग्य वापर केला तर यामुळे मोठमोठ काम केले जाऊ शकते. तर दुसरीकडे याचा अयोग्य वापर केला तर तोच धोकादायक ठरतो. त्यामुळे हे व्यक्तीवर अवलंबून असते की, तो आपली बुद्धी कशी वापरतो.

पण तुम्हाला माहितीये का, तुमच्या मेंदूची डेटा स्टोअर करण्याची क्षमता किती आहे? जाणून घेऊया.

जेव्हाही आपण लॅपटॉप, कम्प्युटर, स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्याची मेमरी किती आहे हे आधी चेक करतो. यात रॅम (RAM), रोम (ROM) अशा दोन पद्धतीच्या मेमरी असतात. त्यावरून किती डेटा स्टोअर होऊ शकतो हे समजते.

कोणत्याही लॅपटॉपचे स्टोरेज युनिट थोडे असते, त्याचप्रमाणे मानवी मेंदूच्या युनिटला न्यूरॉन्स म्हणतात. न्यूरॉन्स हा मानवी मेंदूचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो माहितीचे संचयन आणि प्रक्रिया दोन्ही करतो. हे दोन्ही काम एकच मेंदू करत असल्याामुळे, मानवी मेंदू किती GB आहे हे शोधणे शास्त्रज्ञांना अवघड आहे.

Human Brain
Student Mental Health : विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचू नका तर उभारी घ्या; आत्महत्येचा पर्याय चुकीचा

न्युरॉन्स ३ प्रकारचे असतात. सेंसरी न्युरॉन्, मोटर न्युरॉन्स आणि रिले न्युरॉन्स यांचे काम मेंदूतील सुचनांचे आदान-प्रदान करणे आणि विश्लेषण करणे हे असते. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, हे न्युरॉन्सचे निर्माण माणसाच्या विचारांवर अवलंबून असते.

एका संशोधनात माणसाच्या मेंदूची मेमरी जीबीमध्ये मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशोधकांना आढळले की, एक न्यूरॉन दुसऱ्या न्युरॉनच्या साधारण हजार वेळा संपर्कात येतो. याचा अर्थ मेमरीच्या भाषेत सांगायचे तर हे जवळपास २.५ पेटा बाइट (PB) असते. यानुसार बघितले तर मेंदूची मेमरी किती हे तपासणे फार क्लिष्ट आहे. याविषयी आजवर अनेक संशोधन झाले आहेत. पण एक ठोस आकडा मिळू शकलेला नाही.

Human Brain
Women's Mental Health : महिलांमध्येच होतात जास्त मूड स्वींग; हे पदार्थ खा आणि मूडला ठिक करा!

असे म्हटले जाते की, आपण जेवढी जास्त बौद्धीक मेहनत करतो तेवढी याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे जेव्हा घरचे आपल्याला अभ्यासाने माणूस हुशार होतो असे म्हणतात, त्यामागे हे लॉजिक असते. अभ्यासात बरीच बौद्धिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे मेंदूची क्षमता अधिक वाढते असे संशोधनातून समोर आले आहे. व्यक्ती जेवढी बौद्धिक, मानसिक कष्ट घेतो तेवढी त्याची क्षमता वाढत जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.