Hypertension : युट्यूब पाहून व्यायाम करताय? मग, वेळीच थांबा.! 'सिक्स पॅकचा' भुलभुलैया वाढवतोय तरुणांमध्ये अतिउच्च रक्तदाब

Hypertension : सिक्स पॅकच्या वाढत्या आकर्षणापोटी तरुणाईकडून परस्पर केला जाणारा अतिव्यायाम, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाणारी औषधे यातून ३० वर्षांखालील तरुणाईत अतिउच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.
Hypertension
Hypertensionesakal
Updated on

Hypertension : सिक्स पॅकच्या वाढत्या आकर्षणापोटी तरुणाईकडून परस्पर केला जाणारा अतिव्यायाम, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाणारी औषधे यातून ३० वर्षांखालील तरुणाईत अतिउच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. यातून निर्माण होणारी गुंतागुंत जीवघेणी ठरत आहे. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या २० पैकी तीन तरुणांमध्ये रक्तदाबाची समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय शरीरसौष्ठव बनविण्याच्या हौसेला आवर घालण्याची वेळ आली आहे.

तंदुरुस्त आरोग्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहाराची गरज आहे. त्याचे महत्त्व जाणून घेत आबालवृद्ध रोज फिरायला जाणे, हलका व्यायाम करणे, योगा करणे असे छंद जोपासतात. अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम जरूर करतात; मात्र गेल्या दहा वर्षांत समाजमाध्यमाचा वापर वाढत आहे.

Hypertension
Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

युट्यूबसह समाजमाध्यमावर येणारी शरीरसौष्ठव संदर्भातील माहिती, तगडे मसल्सवाल्या मॉडल्सची छायाचित्रे, हिंदी-मराठी अभिनेत्यांनी बनवलेले शरीरसौष्ठव व त्यातून त्यांची वाढलेली लोकप्रियता या साऱ्यातून अनेक तरुण वर्गही व्यायामासाठी जात आहे. काहीजण विविध पद भरतीच्या सरावासाठी व्यायाम करतात. यातील ७० टक्के तरुण केवळ वाचलेल्या, पाहिलेल्या माहितीवर आधारित स्वतःहून व्यायाम करतात.

काहीजण जिममध्ये जातात. तेथे वजन उचलण्यामुळे बांध सुदृढ होतात, अशा समजातून अनेकजण शारीरिक, मानसिक क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलतात, काहीवेळा परिचित औषध निर्मात्यांकडून गोळ्या किंवा सप्लीमेंटस घेतात. ते किती प्रमाणात घ्यावे, व्यायाम किती प्रमाणात करावा, याचा शास्त्रीय आधार न घेताच अवलंब करतात. यातून कधी छातीत दुखले तर सीपीआरमध्ये उपचारासाठी येतात. येथे चाचण्यांतून अनेकांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे उघड होते.

Hypertension
Pulmonary Hypertension : पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक असतो या आजाराचा धोका

मद्यपान, धूम्रपानाचे व्यसन

अनियमित व अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे स्नायू ताण, रक्तदाब वाढला. यातून काहींना हृदयविकाराचा झटका अशी लक्षणे दिसत आहेत. अशाच रक्तदाब वाढलेल्या काही तरुणांचा इतिहास तपासला असता सकाळी व्यायाम, सायंकाळी अतिमांसाहार, मद्यपान, धूम्रपान अशा व्यसनाधीनतेत ते दिसले. त्यांना रक्ताच्या गाठी झाल्याचेही दिसले. काहींना रक्तदाब निवळण्याच्या गोळ्याही सुरू कराव्या लागल्या आहेत.

ही खबरदारी आवश्यक...

जिमला जाणे, व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मर्यादित आहार घ्यावा.

फळे, पालेभाज्यांचे सेवन आवश्यक.

उच्च रक्तदाबाचे असे येतात रुग्ण

१०० : ३० वर्षांखाली व्यक्तीची सरासरी तपासणी

२० ते २२ : उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्ती

१० ते १५ : अतिव्यायाम केलेल्यांची संख्या

(आकडेवारी महिन्याची)

३० वर्षांखालील तरुणांमध्ये रक्तदाब वाढीची लक्षणे दिसत आहे. अनेक तरुणांना लक्षणे दिसूनही ते उपचार घेणे टाळतात; तसेच तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ व्यायाम किंवा वजने उचलण्याचा प्रयत्न करणे. असंतुलित आहार, बदलती जीवनशैली, अतिजागरण, फास्ट फूड, मद्यपान, धूम्रपानाचे अतिसेवन यातूनही रक्तदाब वाढीला बळ मिळाल्याचे दिसते. त्यामुळे तरुणांनी खबरदारी घेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायामाचा सराव व आहार घ्यावा.

— डॉ. रणजित पालकर, कार्डियोलॉजिस्ट.

Hypertension
Health Care : ॲलर्जीपासून दूर राहायचंय? मग, आवडीच्या पदार्थांना करा बाय बाय..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.