ICMR Health Report :स्वयंपाक करताना वापरलेलं तेल पुन्हा वापराव का? ICMR ने सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

स्वयंपाकाचे तेल एकदा वापरले की पुन्हा कधीही वापरू नये, कारण तेलामध्ये ट्रान्स-फॅटी अॅसिडचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्यासाठी चांगले नाही.
 icmr alert Do Not Reuse Used Oil Once It Is Harmful
icmr alert Do Not Reuse Used Oil Once It Is Harmful
Updated on

स्वयंपाक घरात अनेक पदार्थ केलं जातात. प्रत्येक महिलेला सर्व गोष्टींची बचत करत संपूर्ण घर सांभाळावे लागते. महिन्याचं वाण सामान, स्वयंपाक घरात लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. बहुतांश महिला यामध्ये काटकसर करताना दिसतात.

विशेषतः अनेक गृहिणी स्वयंपाक करताना तेलाची बचत करताना दिसतात. कोणत्याही भारतीय खाद्यपदार्थ हा तेलाशिवाय पूर्णच होत नाही. तेल हा स्वयंपाकातला महत्त्वाचा आणि मूलभूत घटक आहे. त्यामुळं अनेकदा गृहिणींचा कल पुरी किंवा तळण्याचे कोणतेही पदार्थ बनवले की उरलेले तेल पुन्हा वापरण्याकडे असतो. पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणत्याही प्रकारचे तेल 'वारंवार गरम करण्या'पासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

तुम्ही एखाद्या दुकानामध्ये पाहिलं असेल की, एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करुन वापरलं जातं. खरं तर अनेक ठिकाणी याचप्रकारे खाद्यपदार्थ तयार केले जातात.

इतकचं काय तर घरीसुद्धा हा अनुभव प्रत्येकाला आला आहे. परंतु, वैद्यकीय संशोधन संस्थेने म्हटले आहे की, वनस्पती तेल वारंवार गरम केल्याने विषारी संयुगे तयार होतात ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.

 icmr alert Do Not Reuse Used Oil Once It Is Harmful
Kitchen Hacks: फ्रिजमध्ये चिरलेल्या भाज्या आठवडाभर ताज्या ठेवायच्यात? या टिप्स करा फॉलो

ICMR ने, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या सहकार्याने, विविध वयोगटातील लोकांसाठी 17 नवीन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत ज्यामुळे त्यांना चांगले अन्न निवडण्यात मदत होईल. भारतीयांना चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारचे कुपोषण रोखण्यासाठी आरोग्यदायी अन्न निवडीबाबत शिफारसी देणे हे मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे.

 icmr alert Do Not Reuse Used Oil Once It Is Harmful
Kitchen Hacks: कितीही लक्ष दिलं तरी दूध उतू जातं? 'या' टिप्स करा फॉलो

वनस्पती तेलांचा पुनर्वापर करण्याबद्दल ICMR काय म्हणते?

ICMR ने सांगितले की, तुम्ही हे तेल भाज्यांसारख्या वस्तू बनवण्यासाठी वापरू शकता. पण साधारणपणे तेलात तळल्यानंतर ते तेल पुन्हा तळण्यासाठी वापरू नका. याव्यतिरिक्त, उरलेले तेल तळल्यानंतर एक किंवा दोन दिवसातच वापरा असा सल्लाही ICMR ने दिला आहे.

तज्ज्ञांनीही इशारा दिला

वनस्पती तेल वारंवार गरम केल्याने ट्रान्स फॅट्स आणि ऍक्रिलामाइड सारखी हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, तेल पुन्हा गरम करणे आणि पुन्हा वापरल्याने हानिकारक मुक्त रॅडिकल्स आणि इतर विषारी पदार्थ जमा होऊ शकतात जे जळजळ, हृदयरोग आणि यकृताच्या नुकसानास कारणीभूत ठरतात.

 icmr alert Do Not Reuse Used Oil Once It Is Harmful
Kitchen Hacks: लसूण सोलायचा कंटाळा आलाय? या जबरदस्त ट्रिक्स तुमच्या कामी येतील

हे धोके टाळण्यासाठी एकच तेल अनेक वेळा वापरणे टाळणे गरजेचं आहे. तसेच, ॲव्होकॅडो किंवा करडई तेल आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहे. त्याचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

याशिवाय, स्वयंपाकाचे योग्य तापमान राखून आणि एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर न केल्याने संभाव्य आरोग्य धोके लक्षणीयरीत्या कमी करता येतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी, ताजे, प्रक्रिया न केलेले तेल नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.