Video: मावा, तूप, मिठाई खाऊन पडू शकता आजारी, घरी 'अशा' पद्धतीने ओळखा भेसळयुक्त पदार्थ

Festival Sweet Dishes : सणासुदीच्या काळात बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त मिठाई खाऊन आजारी पडू शकता. भेसळयुक्त मिठाई घरीच कसे ओळखाल हे जाणून घेऊया.
Festival Sweet Dishes
Festival Sweet Dishes Sakal
Updated on

Festival Sweet Dishes : सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे अनेक घरात गोड पदार्थ बनवले जातात तर काही लोक बाजारातून मिठाई विकत आणतात. जर तुम्ही बाजारातून आणलेली मिठाई खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण बाजारातील मिठाई खाऊन तुम्ही आजारी पडू शकता. बाजारात पैसे कमवण्यासाठी भेसळयुक्त मिठाई विक्री केली जात आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य धाक्यात येऊ शकते. मिठाईमधील भेसळ कशी ओळखावी आणि हे जाणून घेऊया.

तुप, मावा मिठाईत सर्रास भेसळ होत आहे. चवीचवीने मीठाई खात असाल तर आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मावा, तुपात कशी भेसळ केली जाते हे जाणून घेऊया.

भेसळयुक्त माव्यात कोणते पदार्थ असतात?

टॅल्कम पावडर

चुना

खडू

पांढरे रसायन

नकली मावा कसा बनवतात?

नकली मावा बनवण्यासाठी दुधात यरिया, डिटर्जंट पावड मिक्स करतात.

तुपात भेसळ कशी केली जाते?

निकृष्ट दर्जाचे तूप, शुद्ध तेल, पाणी आणि शुदध दूध एकत्र मिसळतात. बनावट तुपातील साधं वनस्पती तेल, पाम तेल वापरले जाते. तसेच तूप आकर्षक बनवण्यासाठी कृत्रिम रंग आणि सुगंध टाकला जातो.

Festival Sweet Dishes
Fake Butter: लहान मुलांना ब्रेड-बटर खायला देताय? तर थांबा, व्हायरल व्हिडिओचं सत्य पाहा

पुढील आजार उद्भवतात

निकृष्ट साहित्य वापरून मावा, मिठाई बनवली जात असल्याने कमी किंमतीत विकले जाते. भेसळयुक्त मिठाई खाल्याने पुढील गंभीर आजार होऊ शकतात.

  • नकली तूप खाल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

  • लिव्हर खराब होऊ शकते.

  • अचपन आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

  • महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो.

  • कॅन्सरसारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो.

सणासुदीला मिठाईचा जास्त विक्री होते. यामुळे सर्व ठिकाणी अन्न नमुने घेण्यात यावे, जिथे भेसळयुक्त पदार्थ तयार केले जातात तिथे जप्ती करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. '

वा.म. ठाकूर सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

तुपातील भेसळ कशी ओळखाल?

एक चमचा तूप घेऊन ते एका काचेच्या ग्लासमध्ये ओतावे. नंतर त्यात आयोडीनचे एक किंवा दोन थेंब टाका. तूपात भेसळ असल्यास रंग लगेच बदलतो. त्यामुळे तुम्ही बाजारातून मावा, तूप मिठाई आणत असाल तर अशा पद्धतीने भेसळ घरीच ओळखू शकता आणि सणसुदीच्या काळात निरोगी राहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()