Water Bottle : जर तुम्ही एकाच बॉटलनी पाणी पिता तर सावधान! रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

अनेकदा लोक बाहेर जातात किंवा ऑफीसला जातात तेव्हा सोबत पाण्याची बॉटलसुद्धा घेऊन जातात.
Water Bottle
Water Bottle sakal
Updated on

Water Bottle : अनेकदा लोक बाहेर जातात किंवा ऑफीसला जातात तेव्हा सोबत पाण्याची बॉटलसुद्धा घेऊन जातात. काही लोक घरीसुद्धा त्याच बॉटलनी पाणी पितात. अनेकदा लोक पाण्याच्या बॉटल रीयूज करतात.

याच बॉटल कधी पाणी भरण्याच्या तर कधी ज्यूस भरण्याच्या कामी येते. नुकत्याच एका रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. या रिसर्चविषयी जाणून घेतल्यानंतर कदाचिक तुम्ही पाण्याची बॉटल पुन्हा वापरणे सोडून द्याल.

रीयूजेबल पाण्याची बॉटल टॉयलेट सीटपेक्षाही अस्वच्छ असते. रिसर्चनुसार रीयूजेबल बॉटलवर टॉयलेट सीटच्या तुलनेत जवळपास 40,000 पट अधिक बॅक्टीरिया असू शकतात. (if you are drinking Water from the same Bottle be alert read what research said)

रिसर्चमध्ये काय सांगितले?

पाण्याची ट्रीटमेंट आणि शुद्धतावर काम करण्यासाठी अमेरीकी कंपनी वॉटरफिल्टरगुरुच्या एका टीम ने पाण्याच्या बॉटलच्या वेगवेगळ्या पार्टवर जेव्हा तपासले तेव्हा त्यांना खूप बॅक्टीरिया दिसून आला.

रिपोर्टनुसार ग्राम निगेटिव रॉड्स आणि बॅसिलस सापडले. तर ऑस्ट्रेलियाच्या कॅथोलिक विश्वविद्यालय क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि नैदानिक मनोवैज्ञानिक आणि होर्डिंग डिसऑडर एक्सपर्ट, एसोसिएट प्रोफेसर केओंग यापच्या म्हणण्यानुसार आपल्या जवळपास दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू देखील आपल्याला धोका देतात.

Water Bottle
Plastic Bottle : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने शुक्राणूंची संख्या होते कमी

रिसर्चमध्ये सांगितल्याप्रमाणे पाण्याची बॉटल अनेकदा वापरलेली बॉटल सुद्धा स्वच्छ दिसते. मात्र त्या प्लास्टिकला कंपन्यांनी हानिरहित सांगितले पण तरीसुद्धा त्यातून पाणी पिणे सेफ नाही. बॉटलच्या टोकावर टॉयलेट सीट च्या 40 हजार पट जास्त जर्म्स असतात. हा अमाउंट पाळीव कुत्रा मांजरच्या भांड्यांपेक्षाही 14 पट जास्त असतो. म्हणजेच त्याचं भांडं हे आपल्या बॉटलपेक्षा कितीतरी पटीने साफ आणि स्वच्छ असतं.

Water Bottle
Water Supply Scheme : समान पाणी पुरवठा योजनेचे वर्षात केवळ १५ टक्के काम

हे बॅक्टेरीया आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे पोटाच्या विकारासाठी हे अधिक धोकादायक असतं. आतड्यांचे आजारालाही हे बॅक्टेरीया निमंत्रण देतात.

यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टीक बॉटलनी पाणी पिणे सहजा टाळावे. कारण प्लास्टीक बॉटलनी पाणी पिणे शरीरासाठी आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी योग्य नसतं. त्यापेक्षा काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे योग्य असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()