आजच्या काळातील जीवनशैलित स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. फिटनेसचा संबंध थेट आपल्या दिनचर्येशी असतो. दिवस सुरु झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही काम करतो किंवा खातो, पितो त्याच्या थेट परिणाम आपल्या फिटनेसवर होतो. पण इतकं करूनही वजन कमी होत नाहीय तेव्हा काही घरगुती उपाय केले जातात. ज्याने खरचं फायदा होतो.
आज एका पदार्थाच्या पावडरीबद्दल जाणून घेऊयात. या पावडरमुळे तुम्ही काही दिवसात वाढलेले वजन कमी करू शकाल. तूम्ही लोणचे, नान, पापड, अनेक भाज्या आणि समोसे आणि कचोरीतही कलोंजी चाखली असेल. कलोंजीच्या बिया वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखतात.
एक चिमूटभर कलोंजीच्या बिया (५-१०) घ्या आणि बारीक वाटून पावडर बनवा. एक ग्लास कोमट पाण्यात कलोंजी पावडर घाला आणि चांगले मिक्स करा. त्यात एक चमचा मध घालून अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. सर्व एकजीव करून सेवन करा.
एका बाऊलमध्ये ८ ते १० कलोंजीच्या बिया घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. आता ही कलोनजी १-२ दिवस उन्हात ठेवा. वजन कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा २ ते ४ कलोंजीच्या बिया घ्या. कलोंजीच्या काही बिया घ्या आणि कोमट पाण्याने गिळून घ्या किंवा एका ग्लासमध्ये ८ ते १० कलोंजीच्या बिया टाका आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी बिया काढून कलोनजीचे पाणी प्या.
रीकाम्या पोटी घेणे फायदेशीर
अर्धा ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर कलोंजी पावडर टाका. त्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस घालून सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा. हे पाणी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घ्या.
रात्री लवकर झोपा
रात्री खाल्लेले अन्न पचायला वेळ लागतो. त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर करून चांगली झोप घेणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी कमीतकमी 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आराम तर मिळेच, शिवाय तुम्ही सकाळी पूर्ण स्पूर्तीने तुमच्या कामाची सुरुवात करू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.