गरोदरपणात स्त्रीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याला शरीरात होणारे बदल कारणीभूत असतात. गरोदरपणात शरीरात होणारे बदल हे केवळ गरोदरपणात दिसत नाहीत तर गरोदरपणानंतर अर्थात डिलिव्हरी नंतर सुद्धा दिसू शकतात. हे बदल अनेकदा शारीरिक समस्या घेऊन येतात आणि डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा या समस्या पाठ सोडत नाहीत. अशीच एक समस्या म्हणजे कंबरदुखी होय.
अनेक स्त्रियांना गरोदरपणानंतर कंबरदुखीला सामोरे जावे लागते.कधी कधी या वेदना इतक्या जास्त असतात की स्त्रीला सहन सुद्धा होत नाही. यामुळे दैनंदिन कामे करणे सुद्धा जिकरीचे होऊन बसते. यावर डॉक्टरांमार्फत उपचार घेता येतात, पण असे काही साधेसोपे घरगुती उपाय आहे जे प्राथमिक उपचार म्हणून करता येतात. हेच घरगुती उपाय कोणते आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत.
1) डिलिव्हरी नंतर कंबर दुखीवरचा सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे दिवसातून थोडा थोडा वेळ कंबरेला तेलाने मालिश करत राहावे. मालिश केल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायूंना वेदनेपासून आराम मिळतो.
2) कंबरदुखी पासून आराम मिळवण्यासाठी गरम किंवा थंड पाण्याने शेक द्यावा. गरम किंवा थंड वॉटर बॅग कंबरेवर लावल्याने सुद्धा वेदनेपासून आराम मिळतो.
3) कंबरेवर वेदना निवारक ऑइंटमेंट सुद्धा लावू शकता. यामुळे अजून जलद आराम मिळेल. हे अगदी प्राथमिक उपाय असून यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात.
4) अनेकांना हे माहीत नसते की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा कंबरदुखी होते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य राखायला हवे. जर कॅल्शियमचे प्रमाण नीट असेल तर साहजिकच वेदना कमी होतील. कॅल्शियमची ही कमतरता भरून काढण्याची क्षमता दुधामध्ये असते. त्यामुळे डिलिव्हरी नंतर स्त्रीने नियमित दूध पिणे गरजेचे आहे. जेवढे जास्त दुधाचे सेवन स्त्री करेल तेवढी कॅल्शियमची मात्रा शरीरात टिकून राहील.
5) डिलिव्हरी नंतर एका महिन्यात स्त्रीने आपले वजन कमी करून पूर्वीच्या शेप मध्ये येण्याचा प्रयत्न करावा. यासाठी शक्य तितका सकस आहार घ्यावा आणि डाएट फॉलो करावं. वजन जास्त असल्यास कंबरेवर दाब पडून अधिक वेदना होऊ शकतात.
काही वेळा घरगुती उपचार कंबरदुखी वर प्रभावी ठरत नाहीत आणि वेदना सुद्धा कमी होत नाहीत. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट ठरते. अजून काही लक्षणे आहेत जी दिसू लागल्यास स्त्री ने वेळ न घालवता आवर्जून डॉक्टरांना दाखवावे. जर वेदना खूप असतील आणि कमी न होता सतत वाढत असतील, कंबरदुखी सोबतच ताप सुद्धा येत असेल, जर पडल्याने कंबरदुखी सुरु झाली असेल, एक किंवा दोन्ही पाय सुन्न झाल्याचे वाटत असेल, डिलिव्हरीच्या 6 महिन्यांनंतरही कंबरदुखी थांबली नाही तर अशा काही स्थितींमध्ये अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.