Yoga Tips: गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका साजरी केली जाते. हिंदू धर्मात या व्रताला खुप महत्व आहे. यंदा ६ सप्टेंबरला म्हणजेच आज हरतालिका साजरी केली जात आहे. हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं. या दिवशी महिला पतीला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी उपवास करतात. तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे असेल तर पुढील साध्या आणि सरळ योगासनांचा सराव करू शकता. योगा केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते.