Health Care News : तुमचाही BP लो होतोय का? मग आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा, लवकर आराम मिळेल

कमी रक्तदाबाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा जेणेकरून अशी समस्या उद्भवणार नाही.
health
healthsakal
Updated on

हल्ली बहुतेक लोक लो बीपीचे शिकार होत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे अशी समस्या उद्भवत आहे. पण ही समस्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. अशा स्थितीत अनेक वेळा चक्कर येणे, मळमळ, अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.

कमी रक्तदाबाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा जेणेकरून अशी समस्या उद्भवणार नाही.

1.लिंबूपाणी

लिंबूपाणी भरपूर समस्येवर फायदेशीर आहे. लो ब्लडप्रेशरच्या समस्येमध्ये जर आपण लिंबूपाणीमध्ये थोडे जास्त मीठ टाकून प्यायल्यास, खूप फायदेशीर ठरू शकते. मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, त्यामुळे बीपी सामान्य स्थितीत येतो.

2. ताक

कमी रक्तदाबाच्या रुग्णाने सकाळी किंवा नाश्त्यानंतर ताक घ्यावे. ताक प्यायल्यास, तुम्हाला तुमच्या लो बीपीवर नियंत्रण मिळविता येते. यासाठी तुम्ही साधे ताक पिऊ शकता, तसंच ताकामध्ये मीठ, भाजलेले जिरे आणि हिंग मिसळून देखील पिऊ शकता. याने तुमचा बीपी नक्कीच नियंत्रणात येईल.

health
Health Care News : वजन कमी करण्यासाठी 'या' हेल्दी सॅलडचा आहारात समावेश करा, लवकरच दिसेल फरक

3. पनीर

लो बीपीची समस्या असल्यास पनीर खाणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही पनीरमध्ये चाट मसाला किंवा मीठ घालून खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला ताकदही मिळेल आणि लो बीपीच्या समस्येतही आराम मिळेल.

4. डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडते. डार्क चॉकलेटचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. डार्क चॉकलेटमध्ये असे गुणधर्म देखील आढळतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि सामान्य करण्यास मदत करतात.

5. कॉफी

जर तुम्हाला लो बीपीची समस्या असेल तर कॉफीचे सेवन करावे. कारण यात असलेले कॅफिन रक्तदाब वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर जर तुमचा बीपी अचानक कमी झाला असेल तर लगेच कॉफीचे सेवन करावे. असे केल्याने तुमचा बीपी नियंत्रित राहील.

6.अंडी

अंड्यामध्ये प्रोटीन, फोलेट आणि लोह असते जे लो बीपीची समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही लो बीपीमध्येही अंड्याचे सेवन करू शकता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com