कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. कारण अनेक हार्मोन्स बनविण्यास कोलेस्ट्रॉल मदत करतो. कोलेस्ट्रॉल शरीरात कॅल्शियम मात्रा पुरवतो. जर कोलेस्ट्रॉल शरीरात नसेल तर माणूस जास्त दिवस जगू शकत नाही.
कोलेस्ट्रॉल शरीरात टेस्टोस्टेरोन, एस्ट्रोजेन हार्मोन्ससह अनेक हार्मोन्स तयार करतात. याशिवाय मेटाबोलिजमला बूस्ट करण्यातही कोलेस्ट्रॉल मदत करतो. कोलेस्ट्रॉल लीवर आणि आतड्यांना पुरक घटत निर्मित करतो. शरिरासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा घटक माणसाचा जीवही घेतो. जाणून घ्या, कसं?(if you want to make safe from risk of having heart attack check Cholesterol Levels)
शरीरासाठी कोणते कोलेस्ट्रॉल चांगले?
कोलेस्ट्रॉलचा एक प्रकार आहे ज्याला लाइपोप्रोटीन म्हणतात. लाइपोप्रोटीन दोन प्रकारचे असतात. लो डेंसिटी लाइपोप्रोटीन (LDL) आणि हाय डेंसिटी लाइपोप्रोटीन (HDL). एचडीएल (HDL) वाढणे शरीरासाठी चांगलं असतं तर एलडीएल (LDL) वाढणे धोकादायक असतं.
एलडीएल ला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. एलडीएल जास्त असल्यास रक्तात क्लॉट जमा होतात ज्यामुळे हार्टचे आजार वाढतात. एवढंच काय तर हार्ट अटॅक येण्याचाही धोका वाढतो.
कोणत्या वयात किती कोलेस्ट्रॉल असायला हवे?
वय आणि लिंगानुसार कोलेस्ट्रॉलची लेवल वर-खाली होऊ शकतो. 19 वर्षापेक्षा कमी असणाऱ्यांचा टोटल कोलेस्ट्रॉल लेवल 170 च्या खाली असायला हवा. असे व्यक्ती नॉन- एचडीएल 120 च्या खाली , एलडीएल 110 च्या खाली आणि एचडीएल 45 च्या वर असायला हवा.
जर व्यक्तीचे वय 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर टोटल कोलेस्ट्रॉल 125 पासून 200 च्या मध्ये असायला हवा. नॉन-एचडीएल 120 च्या खाली, एलडीएल 100 च्या खाली असायला हवा. तसेच एचडीएल 60 च्या वर असायला हवा.
जन्माच्यावेळी बेबी गर्लला बेबी बॉय च्या तुलनेत गुड कोलेस्ट्रॉलची अधिक आवश्यकता असायला हवी. बेबी बॉयला एचडीएल 40 पेक्षा अधिक असणे गरजेचे असते. बेबी गर्लला 50 पेक्षा जास्त गुड कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते.
कोलेस्ट्रॉल केव्हा होतं शरीरासाठी धोकादायक?
जर व्यक्तीमध्ये टोटल कोलेस्ट्रॉलचा स्तर 240 असेल तर शरीरासाठी खूप धोकादायक मानलं जातं. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल पुरुषांमध्ये 40 च्या कमी आणि महिलांमध्ये 50 पेक्षा कमी असेल तर हे खूप धोक्याचे संकेत आहे.
डॉक्टरांच्या मते टोटल कोलेस्ट्रॉलचा स्तर जर 200 पासून 239 च्या मध्ये असेल तर हा खूप धोकादायक संकेत आहे. एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) ची लेवल जर 100 पासून 159 च्या मध्ये असेल तर हे समजणे गरजेचे आहे की ही कोणत्या आजारासाठी धोक्याचा इशारा आहे.
एका सामान्य पुरुषांमध्ये जर गुड कोलेस्ट्रॉलची लेवल 40 ते 59 च्या मध्ये असेल आणि महिलांची कोलेस्ट्रॉलची लेवल 50 ते 59 च्या मध्ये असेल, तर सावध होणे गरजेचे आहे. असे असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.