World No Tobacco Day: चेनस्मोकिंगची सवय आहे? या आहारामुळे सुटणार धुम्रपान

अनेकदा आपण धुम्रपान सोडण्याचा विचार करतो पण सहज ते शक्य होत नाही
World No Tobacco Day
World No Tobacco Daysakal
Updated on

धूम्रपान शरिराला हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. धूम्रपानामुळे रक्तदाब वाढते आणि त्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो सोबतच रक्त गोठण्याची जास्त शक्यता असते.याशिवाय कोलेस्टेरॉलचीही पातळी वाढते त्यामुळे जर तुम्हाला धुम्रपानाची सवय असेल तर आताच धूम्रपणे सोडणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही धूम्रपान सोडता तेव्हा हृदयविकाराचा धोक तसेच कर्करोगाचाही धोका कमी होतो. (if you want to quit smoking eat these healthy food check list here)

आज ३१ मे हा 'वर्ल्ड नो टोबॅको डे' (World No Tobacco Day) म्हणजेच जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्टे तंबाखू खाण्यापासून रोखणे आहे.

अनेकदा आपण धुम्रपान सोडण्याचा विचार करतो पण सहज ते शक्य होत नाही. अनेकदा कित्येक प्रयत्न अपयशी ठरतात पण आज आम्ही तुम्हाला असे योग्य अन्न आणि पोषक अन्न घेण्यास सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहजतेने धूम्रपान करणे सोडू शकता.

World No Tobacco Day
पुरूषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराचा अधिक धोका, त्वरीत जाणून घ्या लक्षणे नाहीतर..

1. अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता, हृदयाची धडधड, आणि हात आणि पाय सुन्न होणे ही B 12 च्या कमतरतेची काही सामान्य लक्षणे आहेत आणि दीर्घकाळापर्यंत यामुळे नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे, अशक्तपणा जाणवते याकरीता तुम्ही अंडी, चीज, दूध, दही आणि बी12 चे चांगले स्त्रोतचे सेवन करु शकता.

2. अधिक क्रुसीफेरस भाज्या खा ज्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.

World No Tobacco Day
'या' पदार्थांचे सेवन करा; हार्ट अटॅकला दूर ठेवा

3. व्हिटॅमिन ए (A) ची कमतरता सामान्य आहे. सरसों का साग, व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत आहे. A चे इतर चांगले स्त्रोत म्हणजे भोपळा, कॉर्न, लाल मिरची, संत्री गाजर , जे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करतात


4. व्हिटॅमिन सी (c ) अँटिऑक्सिडंट शरीरात निर्माण करतात ज्यामुळे धूम्रपानामुळे शरीरात तयार होणारे मुक्त रॅडिकल्स नष्ट होतात. व्हिटॅमिन सी मध्ये संत्री, लिंबू, अननस, हिरवी मिरी आणि टरबूज यांचा समावेश असतो.

World No Tobacco Day
कॉफी पिणं पडू शकतं महागात; Heart Attack येण्याचा धोका

३१ मे रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' साजरा करण्यामागे उद्दीष्टे जगभरातील धूम्रपानाचे दुष्परिणाम पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे, हे होते. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ पासून दरवर्षी ७ एप्रिल रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळला जाईल अशी घोषणा केली होती, परंतु काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि ३१ मे हा दिन निश्चित करण्यात आला. म्हणून १९८८ सालापासून दर ३१ मे रोजी वर्ल्ड नो टोबॅको डे पाळण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.