Childhood Illnesses :तुमची मुलं सतत आजारी पडतात? ही असू शकतात त्यामागची कारणं, एकदा वाचाच

जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असेल तर या मागे अनेक धक्कादायक कारणे असू शकतात.
Childhood Illnesses
Childhood Illnessessakal
Updated on

Childhood Illnesses : आजारपण हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या वाटेला येतं. अशात लहान मुले अनेक आजारांचे शिकार होतात पण जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असेल तर या मागे अनेक धक्कादायक कारणे असू शकतात. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (if your child getting sick so often may be these reasons behind it read story for healthy lifestyle )

१) तुमच्या मुलांचा आहार योग्य आहे का ?

आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार.आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते. त्यामुळे मुलांना पोषक आहार मिळणे गरजेचे असते.

२) तुमच्या मुलांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का?

तुमची मुलं जर सतत आजारी पडत असेल तर त्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे. त्यामुळे त्यावर लगेच उपचार घेणे गरजेचे आहे.

Childhood Illnesses
Weight Loss : झोपण्यापूर्वी ही कामे केल्यास वजन होईल कमी

३) मुलं पुरेसे पाणी पिताय ना ?

जर तुमच्या शरीरात ६० टक्के पाणी असेल तर त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मुलांच्या शरीरात पाणी असणे गरजेचे आहे.

४) मुलांना पुरेशी झोप मिळते आहे का ?

आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडतात त्यामुळे मुलांना पुरेशी झोप मिळणे खूप आवश्यक असते.

Childhood Illnesses
Weight Loss : आवडीचे पदार्थ खाऊनही वजन कमी करता येतं, माहितीये का ?

५) तुमची मुलं तोंडाची नीट स्वच्छता करतात का ?

तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात. त्यामुळे मुलं तोंडाची नीट स्वच्छता करतात का, हे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे.

६) मुलांना ताण आहे का ?

आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे. पण जर मुलांना अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.