Health: मुलांना 'या' सवयींपासून पालकांनी ठेवा दूर, नाहीतर मुलांना हृदयाचे...

पालकांना मुलांच्या हृदयाच्या ठोक्याविषयी माहिती असावी
Health: Child Heart Care
Health: Child Heart Careesakal
Updated on

Child Care: प्रत्येक पालकांना त्यांची मुले प्रिय असतात. मात्र अनेकदा पालकांच्या लाडाने मुलांना अनेक वाईट सवयी लागतात. अनेकदा तुमची मुलं व्हिडीओ गेम खेळत असतात. मात्र तुम्ही त्यांना आळा घातल्यास तुमची हट्टी मुलं रडतात म्हणून तुम्ही त्यांना जेवताना, उठता बसता मोबईल खेळायला देतात. मात्र त्याचे तुमच्या मुलांवर काय परिणाम होतात याची कल्पना तुम्हाला आहे काय? व्हिडीओ गेम खेळणे तुमच्या मुलांसाठी किती घातक ठरू शकतं याबाबत प्रत्येक पालकास माहित असायला हवं.

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका स्टडीनुसार, व्हिडीओचं वेड अतिसंवेदनशिल मुलांच्या आरोग्याला अत्यंत धोकादायक ठरू शकतं. व्हिडीओ गेम मुलांच्या हृदयाचे ठोके एकदम वाढवतात. जे मुलांच्या आरोग्यासाठी फारच धोक्याचं ठरतं. हार्ट रिदममध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार व्हिडीओ गेम खेळणारी मुले त्यांचं मानसिक भान गमावतात. त्यामुळे हृदयसंबंधित रोगांचा धोका वाढतो.

Health: Child Heart Care
Health: जगभरातील लोकसंख्येस नपुंसक बनवू शकतं 'हे' धोकादायक सुपरबग, तज्ज्ञ म्हणाले...

या मुलांना सर्वाधिक धोका

व्हिडीओ गेममुळे काही मुलांच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात. हे त्या मुलांसाठी धोकादायक ठरतं ज्यांना आधीच अनियमित हृदय ठोक्याच्या समस्या आहेत. मात्र अनेक पालकांना मुलांच्या या समस्या माहित देखील नसतात. मात्र पालकांना मुलांच्या हृदयाच्या ठोक्याविषयी माहिती असावी. कारण याकडे दूर्लक्ष केल्यास मुलांना हृदयाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाली मुलांवर स्टड

अनेक मुलांच्या स्टडी करता, व्हिडीओ गेम खेळताना अनेक मुले बेशुद्ध झालेली आढळून आली. स्टडीदरम्यान २२ मुले ही मल्टीप्लेयर वॉर खेळताना आढळली. शास्त्रज्ञांनी हेही सांगितले आहे की, हृदयाच्या समस्यांमुळे मुलांचा मृत्यूही होऊ शकतो.

पालकांनी घ्यावी मुलांबाबत ही काळजी

शास्त्रज्ञांनी सांगितले की, जर मुलांमध्ये हार्ट बीटच्या समस्या असतील तर पालकांनी लक्षणे दिसताच त्यांना इलेक्ट्रॉनिक गेम विशेषत: वॉर गेम्स खेळण्यापासून त्यांना रोखले पाहिजे. रिसर्चदरम्यान अचानक हृदयविकार उद्भवण्याचं मुख्य कारण म्हणजे मुले गेम खेळताना हरल्यास किंवा जिंकल्यास अचानक उत्साहित होतात त्यामुळे त्यांचे हार्ट बीट्स वाढतात. त्यामुळे अचानक उत्साहिक करणाऱ्या गेम्सबाबत पालकांनी सतर्क राहायला हवं. विशेषत: जर तुमच्या कुटुंबात हृदयविषयक समस्यांची हिस्ट्री असेल तर आवर्जून या बाबींकडे लक्ष द्यायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.