घरगुती उपायांचे महत्त्व

आपल्याकडे प्राचीन काळापासून ‘आजीचा बटवा’ ही संकल्पना प्रचलित आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्दी, पडसे, डोकेदुखी, अपचन इत्यादी लक्षणांसाठी आपल्याकडे घरगुती उपाय केले जात असत आणि जिथे आजार बरा होतच नाहीये असे दिसे तेव्हा वैद्याकडे नेले जाई; परंतु आता परिस्थिती बदलली आहे.
घरगुती उपायांचे महत्त्व
घरगुती उपायांचे महत्त्वsakal
Updated on

निवड ‘पॅथी’ची

डॉ. मृण्मयी मांगले,MBBS, Chronic disease reversal expert

आपल्याकडे प्राचीन काळापासून ‘आजीचा बटवा’ ही संकल्पना प्रचलित आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्दी, पडसे, डोकेदुखी, अपचन इत्यादी लक्षणांसाठी आपल्याकडे घरगुती उपाय केले जात असत आणि जिथे आजार बरा होतच नाहीये असे दिसे तेव्हा वैद्याकडे नेले जाई; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता आपण किरकोळ लक्षणांसाठीही लगेच औषध घेतो आणि याचे दुष्परिणाम आपल्याला एक पिढी उलटून गेल्यावर लक्षात येतील हे नक्की.

हल्ली आपण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शारीरिक लक्षणांकडे नकोपणाच्या भावनेने बघतो; तसेच आता औषध घेऊन पटकन बरे व्हायचे आहे, अशी पाऊले उचलतो. मात्र, विचार करा, जर आपण अयोग्य आहार घेतला असेल आणि शरीराला निसर्गतः अशी जाणीव झाली, की हे अन्न पचण्यायोग्य नाही, किंवा हे शरीरात गेल्यावर त्रास होईल इत्यादी, तर शरीर ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करेल आणि तो पदार्थ बाहेर पडला, की उलटी जुलाब आपोआप थांबतील. याला इंग्रजीमध्ये indisposition म्हणतात. म्हणजे आपल्या अयोग्य/ चुकीच्या कृतींमुळे शरीरामध्ये होणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यामुळे दिसणारी लक्षणे. म्हणून बऱ्याचदा उलटी होऊन पोटातील अन्न बाहेर पडल्यावर बरे वाटते. ही लक्षणे आजाराची नसून शरीराच्या प्रतिक्रियेची असतात.

निसर्गतः शरीर आपल्याला काही संकेत देत असेल, तर त्याला प्रत्येक वेळी अडवणे योग्य आहे का? उदा : आपण बाहेर काहीतरी तेलकट, तिखट, जड खाल्ले आणि उलट्या आणि जुलाब होत असतील, तर यावर आपण त्वरित उलट्या, जुलाब बंद करण्याचे औषध किंवा इतर औषधे घेतो. आपली लक्षणे आटोक्यात येतात आणि आपण बरे झालोय असे आपल्याला वाटते; पण शरीराला जे बाहेर फेकायचे होते ते आपण आतमध्ये डांबून ठेवले; तसेच शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये बाधा आणली. यामुळे लक्षणे कमी होतात; पण शरीरामध्ये हानिकारक पदार्थ (toxins) जमा होतात, शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती गोंधळात पडते आणि आपण आरोग्यपूर्ण अवस्थेपासून दूर जाऊ लागतो. आपण दर वेळी पावसात भिजल्यावर होणारे सर्दी-पडसे, अयोग्य खाल्यावर होणारे अपचन, दगदग झाल्यावर होणारी पाठदुखी याला शरीरातील प्रतिक्रिया न समजता आजार समजून दमन करत जातो आणि शरीर हळूहळू मंदावते, आजारी पडू लागते आणि मुख्यतः जुनाट आजारांच्या दिशेने प्रवास करू लागते.

थोडक्यात जुनाट आजार म्हणजे शरीरामध्ये साठलेली टॉक्झिन्स, त्यांना बाहेर काढण्याची शरीराची असमर्थता आणि शारीरिक यंत्रणेतील चयापचय आणि नित्यकर्मांमध्ये आलेले बिघाड. म्हणूनच जुनाट आजार रोखण्यामध्ये आजीच्या बटव्याचे महत्त्व आहे. लहानसहान लक्षणांसाठी घरगुती उपाय केले, तर शारीरिक त्रासही कमी होतो आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये बाधाही निर्माण होत नाही. उदा., अयोग्य आहारामुळे अपचन झालेच, तर थेट औषधे घेण्यापेक्षा, ओवा आणि मीठ घालून उकळलेले पाणी प्यावे, पोटावर हिंगाचा लेप लावावा; तसेच तोंडात लवंग ठेवावी आणि उलट्या, जुलाब कमी झाल्यानंतर दहीभात, केळी, लिंबू सरबत असे पदार्थ खावेत. प्राचीन घरगुती उपाय’ हे आपल्या पूर्वजांकडून मिळालेले वरदान वापरून आपण भारताला जुनाट आजारांपासून दूर ठेवू शकतो आणि एक उत्तम उदाहरण ठेवू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()