Summer Skin Care: उन्हाचा तडाखा वाढतोय..सनस्क्रीन लावायला विसरू नका, Tanning चा धोका टळेल

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना जर त्वचेला सनस्क्रीन लावलं तर यामुळे सनबर्न आणि टॅनिंग कमी होण्यासोबतच अनेक फायदे होतात
summer skin care tips
summer skin care tipsEsakal
Updated on

Summer skin care tips: उन्हाळा म्हंटलं की कडक ऊन आणि घाम या दोन गोष्टी हैराण करणाऱ्या असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरातून पाऊल बाहेर टाकणं देखील नकोसं वाटतं. मात्र बहुतेकांना कामांनिमित्त घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो. importance of sunscreen for protection against skin cancer and tanning

अशात कडक उन्हात जर तुम्ही बाहेर पडत असाल तर डिहायड्रेशन Dehydration, उष्माघात, हीट स्ट्रोक Stroke यासोबतच त्वचेच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

तसचं सुर्याची हानिकारक अशा अल्ट्रावायलेट किरणांमुळे Sun Rays त्वचा करपते. यासाठीच उन्हाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण गरजेचं आहे. 

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना जर त्वचेला सनस्क्रीन Sun Screen लावलं तर यामुळे सनबर्न आणि टॅनिंग कमी होण्यासोबतच अनेक फायदे होतात. अनेकजण सनस्क्रीन लावणं टाळतात. कोणत्या प्रकारचं सनस्क्रीन लावावं.

सनस्क्रीनचे फायदे ठाऊक नसल्याने सनस्क्रीन लावणं गांभिर्याने घेतलं जातं नाही. परिणामी उन्हाच्या झळांनी त्वचेवर खोलवर परिणाम होतो. यासाठी आम्ही तुम्हाला सनस्क्रीन लावण्याचे काही फायदे सांगणार आहोत. Sunscreen Benefits for Skin in Summer

त्वचा तरुण राहते- उन्हाळ्यात जर तुम्ही स्किन प्रोटेक्शनशिवाय घराबाहेर पडत असाल तर यामुळे त्वचेचं मोठ नुकसान होतं. सुर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेच कोलेजन, त्वचेच्या पेशी तसचं त्वचेची लवचिकता याच गंभीररित्या नुकसान होतं. यामुळे कमी वयातच तुमचं वय वाढलेलं दिसू लागतं. 

यामुळे कलर डिस्कलरेशन, सुरकुत्या, रुक्ष आणि निस्तेज त्वचा या समस्या निर्माण होवू शकतात. सनस्क्रीन प्रोटेक्शन न वापरल्यास त्वचा अधिक वयस्क दिसू लागते. जर तुमचं वय २० ते ३० मधील आहे तर तुम्ही सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. यामुळे अर्ली एजिंगची समस्या टाळता येईल. Sunscreen for summer  

summer skin care tips
Dark Knees and Elbows: तुमचे कोपर आणि गुडघे काळवंडले आहेत, मग या ट्रीक्स वापरून Black Spots होतील दूर

स्किन इंफ्लेमेशन कमी होईल - जेव्हा तुमची त्वचा थेट सुर्यच्या किरणांच्या संपर्कात येते तेव्हा एक्जिमाची समस्याही वाढू शकते. सुर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचा एपिडर्मिस लाल होऊन सूज येण्याची शक्यता असते. सनस्क्रीनच्या नियमित वापराने या अतिनील किरणांमळे त्वचेचं होणारं नुकसान टाळता येणं शक्य आहे. 

जर तुमची त्वचा अति संवेदनशील असेल आणि त्वचा लाल होत असेल तर झिंक ऑक्साइड आणि टायटेनियम डायऑक्साइड असलेलं सनस्क्रीन वापरावं. ज्यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही. Summer skin care 

टॅनिंग होईल कमी- जर तुम्ही घरातून बाहेर पडताना दररोज सनस्क्रीनचा वापर करत असाल तर तुमची त्वचा टॅन होणार नाही म्हणजेच काळवंडणार नाही. यासाठी सनस्क्रीन खरेदी करताना त्यात टॅनिंग कमी करण्याचे गुण असतील असं पाहून घ्या. प्रत्येक दोन तासांनी सनस्क्रीनचा वापर करा. sunscreen for protection

खास करुन संवेदनशील त्वचा असलेल्यांनी सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. घरातून बाहेर पडण्याच्या किमान २० मिनिटं आधी सनस्क्रीन लावावं. Avoid tanning in summer  

त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो- दररोज उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावल्यास सुर्याच्या अल्ट्रा वायलेट किरणांपासून त्वचेचं रक्षण होईल. यामुळे स्किन कॅन्सर म्हणजेच त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. 

सनस्क्रीन हे केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर प्रत्येक ऋतूमध्ये लावणं गरजेचं आहे. SPF 30 सनस्क्रीन दिवसातून वेळोवेळी लावून स्किन कॅन्सरचा धोका कमी करणं शक्य आहे. 

हे देखिल वाचा-

summer skin care tips
Heat Stroke : उष्माघातापासून असा करा बचाव!

त्वचेचं आरोग्य राहतं चांगलं- स्किन प्रोटीन म्हणजेच कोलेजन, कॅरेटिन आणि इलास्टिन हे सनस्क्रीन लावल्याने सुरक्षित राहतात. हे प्रोटीन त्वचा सॉफ्ट, चमकदार आणि हेल्दी ठेवण्यासाठी गरजेचे असतात. 

अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेची काळजी घ्यायची असेल तर सनस्क्रीनचा वापर गरजेचा आहे. शिवाय फक्त चेहऱ्यासाठीच नव्हे तर गळा आणि हातांसाठी देखील सनस्क्रीन लोशन वापरल्याने त्वचेचं नुकसान होणार नाही. 

summer skin care tips
सोन्यासारखी चेहऱ्यालाही येईल चमक, Glowing Skin साठी हे 5 घरगुती उपाय करुन पहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()