Men Health : पुरुषांनो, चाळीशी आली ! आता या चाचण्या मुळीच चुकवू नका

४० किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांनी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि आरोग्याच्या समस्यांचे संकेत देणारी चिन्हे आणि लक्षणे शोधावीत, ज्यांची गंभीर होण्यापूर्वी काळजी घेतली जाऊ शकते.
Men Health
Men Healthgoogle
Updated on

मुंबई : बहुतेक लोक नियमित तपासण्या किंवा स्क्रीनिंग टेस्ट करण्याला महत्त्व देत नाहीत. अनेकदा व्यग्र आणि अनिश्चित जीवनशैलीमुळे, आपण नियमित प्रतिबंधात्मक काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो.

केवळ आजारादरम्यान आपण चाचण्या करून उपचार तज्ञांचा सल्ला घेतो. याव्यतिरिक्त, अनेक आरोग्य सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की महिलांपेक्षा पुरुषांचे डॉक्टरांकडे जाण्याचे किंवा प्रतिबंधात्मक तपासणी करण्याचे प्रमाण कमी आहे. याविषयी सांगत आहेत न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे मुख्य पॅथोलॉजिस्ट डॉ. राजेश बेंद्रे. (important medical tests for men above 40 years of age )

Men Health
Men's Health : पुरुषांनो 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा बाळाचे आरोग्य येईल धोक्यात

योग्य वेळी तपासणी करणे हा व्यक्तीचे आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी आरोग्यसेवा व्यवस्थेचा एक आवश्यक भाग आहे. त्याचप्रमाणे, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी त्यांची आरोग्य तपासणी करून घेणे अधिक महत्वाचे आहे, ज्यामुळे गंभीर आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

४० किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांनी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि आरोग्याच्या समस्यांचे संकेत देणारी चिन्हे आणि लक्षणे शोधावीत, ज्यांची गंभीर होण्यापूर्वी काळजी घेतली जाऊ शकते.

त्यांना त्यांच्या आरोग्याकडे विशिष्ट पद्धतीने पहावे लागते, त्यांच्या वाढत्या वयाच्या आणि इतर घटकांच्या आधारे आवश्यक चाचण्या घेणे हा एक मार्ग आहे. बऱ्याच आजारांची लक्षणे त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नसल्यामुळे, महत्त्वपूर्ण आरोग्य तपासणीसह नियमित पाठपुराव्यानंतर लवकर निदान होऊन आरोग्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळेल.

ब्लड प्रेशर मॉनिटरिंग - ब्लड प्रेशर एक सायलंट किलर आहे; हे उच्च रक्तदाबाचे मूळ कारण आहे आणि आपल्या हृदय, फुप्फुस, मेंदू, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांना देखील हानी पोहोचवू शकते.

रक्तदाब तपासणी ही सर्वात महत्वाच्या स्क्रीनिंग चाचण्यांपैकी एक आहे आणि ती सोपी, वेदनारहित आहे आणि परिणाम फक्त काही मिनिटे मिळतात. निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 mmHg आहे. रक्तदाबाची स्वतंत्र अशी कोणतीही लक्षणे नसल्यामुळे, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

रक्तशर्करा चाचणी - मधुमेह प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने रक्तातील साखर पातळीचे वाजवी नियंत्रण राखायला पाहिजे. म्हणून, नियमित रक्त शर्करा चाचणी रक्त शर्करा पातळीचे निदान आणि नियंत्रण करण्यास मदत करू शकते आणि प्रारंभिक टप्प्यात जीवनशैलीत बदल आणि उपचारांसह मधुमेह रोखू शकते.

आपल्याला HbA1C-रक्तातील साखरेची तीन महिन्यांची सरासरी पातळी, ट्रॅक करणे देखील आवश्यक आहे. ही चाचणी नाष्टा करण्याआधी आणि नंतर केली जाते. याबरोबरच, योग्य आहारा बरोबरच दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने मधुमेह व्यवस्थापनास मदत होईल आणि आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होईल.

लिपिड प्रोफाइल - जे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची मात्रा मोजण्यास मदत करते. ही चाचणी आपल्या धमन्यांमध्ये फॅटी डीपॉझीट्सच्या वाढीचा धोका निर्धारित करण्यात मदत करते, जे धमन्यांना अवरोधित किंवा संकुचित करू शकते, ज्यामुळे बऱ्याच कोरोनरी धमनी रोगाचा धोका उद्भवतो. 

४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी दर पाच वर्षांनी किमान एकदा लिपिड प्रोफाइल चाचण्यांसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर एखाद्याला हृदयविकार, मधुमेह किंवा मूत्रपिंडाच्या समस्यांशी संबंधित आरोग्याच्या समस्या येत असतील तर वारंवार नियमित चाचण्या करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. 

Men Health
Men Health : इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येवर १ महिन्यात करा मात; आहारात करा असा बदल

कोलोनोस्कोपी - कोलोनोस्कोपी, ज्याला कोलोन कॅन्सर स्क्रीनिंग म्हणूनही ओळखले जाते, ज्या पुरुषांना कोलोन कॅन्सरचा जास्त धोका असतो त्यांना ही चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना स्क्रीनिंग सुरू करण्याचा सल्ला दिला जातो.

वर्षातून एकदा गुप्त रक्तावर भर देऊन मल चाचणी, दर पाच ते दहा वर्षानी फ्लेक्जिबल सिग्मोआयडोस्कोपी आणि किंवा कोलोनोस्कोपी आणि किंवा कोलोनोग्राफी.  जास्त धोका असलेल्या पुरुषांना अधिक वेळा कॉलोनोस्कोपीची शिफारस करू शकतात.   

डोळ्यांची तपासणी - वयाच्या ४० व्या वर्षानंतर, दृष्टी कमी होणे सामान्य आहे, बऱ्याचदा जवळच्या दृष्टीसाठी पॉवर सुधारणा आवश्यक असते. येथे एकमेव मार्ग म्हणजे नेत्रतज्ञाला भेटणे.

आपल्या दृष्टीतील बदलांचा मागोवा घेण्यासाठी, ४० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या पुरुषांसाठी दर दोन वर्षांनी डोळ्यांच्या तपासणीची शिफारस केली जाते.

नियमित डोळ्यांच्या चाचण्यांची वारंवारता बहुतेकदा तुमच्या वाढत्या वयानुसार किंवा एखाद्याला दिसण्यात समस्या येत असल्यास वाढते तसेच, ज्यांना ग्लूकोमाचा धोका आहे त्यांच्यासाठी दर २ वर्षांनी ग्लूकोमा चाचणी करून घेण्याची शिफारस केली जाते आणि चाळीशी मध्ये असताना सुरुवात करू शकता.

याव्यतिरिक्त, मधुमेह असलेल्या रुग्णांना मधुमेह रेटिनोपॅथीसह बदल ओळखण्यासाठी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. 

उपरोक्त नमूद केलेल्या स्क्रीनिंग चाचण्या एखाद्या व्यक्तीस निरोगी राहण्यास आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात. यापैकी काही बाबींमध्ये कोणतीही लक्षणे नसल्यामुळे, एखाद्यास चाचणी शिवाय त्याला समस्या असल्याचे माहित होऊ शकत नाही.

याशिवाय, रोग होऊन नुकसान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा रोग न होण्यासाठी काळजी घेणे जास्त सोपे आणि कमी खर्चाचे असते. एक सोपी गोष्ट अमलात आणण्यासाठी ही योग्य वेळ आहे –  उपचारा पेक्षा प्रतिबंध उत्तम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.