रजोनिवृत्तीची सुट्टी मिळण्यासाठी पहावी लागणार वाट ! पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारत बॅकफूटवर

मेनोपॉज संदर्भात पाश्चिमात्य देशांतील अनेक कंपन्यांनी धोरणे स्विकारण्यास सुरूवात केली आहे.
menopause leave
menopause leaveesakal
Updated on

मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा काळ प्रत्येक महिलेसाठी कठीण असतो. या टप्प्यातून प्रत्येक महिलेला जावे लागते. या संदर्भात पाश्चिमात्य देशांतील अनेक कंपन्यांनी धोरणे स्विकारण्यास सुरूवात केली आहे. तसेच, यासंदर्भात महिलांना त्याचे विशेष फायदे देण्यास ही पाश्चिमात्य देशांनी पुढाकार घेतला आहे. परंतु, India Inc ने अद्याप या समस्येकडे म्हणावे तितके लक्ष दिलेले नाही.

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती हा टप्पा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येतो. वयाच्या ४५-५० या टप्प्यामध्ये रजोनिवृत्तीला सुरूवात होते. रजोनिवृत्ती ही खरं तर एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. ही स्थिती सुरू झाल्यानंतर महिलांची मासिक पाळीची प्रक्रिया थांबते. या दरम्यान महिलांना असंख्य वेदना होतात.

तसेच, या मेनोपॉजची विविध लक्षणे देखील दिसून येतात. ही लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी आढळू शकतात. काही महिलांमध्ये तर रजोनिवृतीची लक्षणे देखील आढळून येत नाहीत. त्यामुळे, ही स्थिती समजून घेणे आणि त्याची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे.

menopause leave
Health Care : मेनोपॉजची सुरुवात कशी ओळखाल? 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

नोकरदार महिलांवर ही रजोनिवृत्तीचा गंभीर परिणाम होतो. या महिलांमध्ये कंपन्यांमधील वरिष्ठ नेतृत्वाचा देखील समावेश आहे. मागील वर्षी (२०२२) या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते.

Financial Express ने या संदर्भात वृत्त दिले आहे. त्यानुसार, 2022 मध्ये Pharma firm Abbott ने मार्केट रिसर्च कंपनी इप्सॉसच्या (Ipsos) भागीदारीमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या सर्वेक्षणानुसार 82% महिलांचा असा विश्वास होता की, रजोनिवृत्तीचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. 81% महिलांनी असे म्हटले की, रजोनिवृत्तीचा त्यांच्या Worklife वर ही परिणाम होतो.

भारतातील ७ शहरांमधील १२०० लोकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात 18% स्त्रियांनी सांगितले की, रजोनिवृत्तीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांमध्ये आणि लक्षणांमध्ये ही त्यांनी काम केले आहे.

शिवाय 26%  महिलांनी असे ही सांगितले की, आम्हाला ही लक्षणे जाणवल्यावर आम्ही त्यासाठी कामातून रजा घेतली. मात्र, रजा घेताना आम्ही रजोनिवृत्तीचे कारण न सांगता वेगळे कारण सांगून रजा घेतली, असे Deloitte India च्या Chief Happiness Officer सरस्वती कस्तुरीरंगन यांनी सांगितले. या साठी सरस्वती यांनी a ‘Women@Work’ study चा हवाला दिला.

menopause leave
Hair Fall In Menopause: मेनोपॉजमुळे केस गळू लागले आहेत? मग हे उपाय करून पाहा

या संदर्भात गुरूवारी (१२ ऑक्टोबर) प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात युएस आणि युकेमधील २००० नोकरदार महिलांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार, 80% महिलांनी या रजोनिवृत्तीच्या लक्षणांचा कामावर परिणाम होतो आणि हे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे असे सांगितले.

या सर्वेक्षणानुसार, रजोनिवृत्तीमुळे कामावरील एकाग्रता कमी होते असे, युएस (42%) आणि युके (56%)  मधील महिलांनी सांगितले. या सगळ्यांमध्ये एक तृतीयांश महिलांना असे वाटते की, रजोनिवृत्तीमुळे त्यांच्या करिअरच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होतो.

Nvidia, Adobe, Genentech, Bristol Myers Squibb या अनेक अमेरिकन कंपन्यांमध्ये मेनोपॉजशी संबंधित तरतूदी करण्यात आल्या आहेत. या सोबतच HSBC UK सारख्या अनेक ब्रिटीश कंपन्यांना रजोनिवृत्तीसाठी अनुकूल म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 'बॅंक ऑफ आर्यलंड' समूहाने रजोनिवृत्तीच्या परिस्थितीतून जाणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांसाठी पगारी रजा जाहीर केली होती. विशेष म्हणजे युरोपमधील अनेक कंपन्या रजोनिवृत्तीवर केंद्रित धोरणांमध्ये वाढ करत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, या कंपन्यांमध्ये Danske Bank आणि Deloitte या कंपन्यांचा समावेश आहे.

menopause leave
Menopause Care : रजोनिवृत्तीचा काळ सोपा करण्यासाठी रुजुता दिवेकरच्या टीप्स

पाश्चात्य  देशांतील कंपन्यांच्या तुलनेत रजोनिवृत्तीच्या समस्येवर भारतात अद्याप काही पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. मात्र, Deloitte च्या अभ्यासानुसार 48% भारतीय महिलांना रजोनिवृत्ती-संबंधित लक्षणांसाठी पगारी रजा देणे हे महत्त्वाचे आहे, असे वाटते.

भारतात Deloitte कंपनी त्यांच्या वार्षिक रजेच्या हक्कानुसार आणि त्याहून अधिक सशुल्क रजा महिलांना ऑफर करते. कस्तुरीरंगन पुढे म्हणाल्या की, ‘व्यावसायिकांना याची जाणीव करून दिली जाते की, मासिक पाळी किंवा रजोनिवृत्ती संबंधित लक्षणे ही आरोग्याच्या रजेमध्ये समाविष्ट केलेली आहेत’.

रजोनिवृत्तीच्या विषयावरील कित्येक प्रश्नांना अनेक कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा त्यांच्याकडून ते नाकारण्यात आले', असे कस्तुरीरंगन यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिना हा ‘जागतिक रजोनिवृत्ती महिना’ (World Menopause Month)  म्हणून जगभरात पाळला जातो. अनेक महिला कर्माचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या रजोनिवृत्तीच्या समस्येचे निराकारण करण्यासाठी आता India Inc काय पाऊल उचलते ? ते पाहणे महत्वाचे ठरेल.

menopause leave
Post Menopause Care : रजोनिवृत्तीनंतर होणारी हाडांची झिज कशी भरून काढाल ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.