Lemon and Clove water for cough and cold: एकदा हिवाळा सुरु झाला की, सर्दी आणि घसा खवखवण्याचा हंगाम सुरु होतो. तुमचे नाक जर चोंदलेले असेल आणि घसा खवखवत असेल तर सकाळी झोपेतून उठायलो नको वाटते. तसेच जर अशक्तपणा असेल तर दिवसभर काम करणे थकवणारे असते. यासाठी सकाळी चहा किंवा कॉफी घेणे टाळावे. त्याऐवजी एक घरगुती उपाय करणे जास्त परिणामकारक ठरते.
रोज सकाळी लिंबू व लवंगाचे कोमट पाणी प्यायलाने सर्दी आणि खोकला नाहीसा व्हायला मदत होते. हे पेय सर्दी आणि खोकलयाची लक्षणे तसेच वजन कमी करण्यात कसे उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस ने MGM हेल्थकेअरच्या मुख्य आहारतज्ञ विजयश्री एन यांच्याशी संवाद साधला.