Women Health: कुटुंबीयांसोबत सांभाळा स्‍वत:चे आरोग्‍य; दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा घ्यावा सल्ला

Women Health: कुटुंब, घर सांभाळत नोकरी करणाऱ्या महिलांचे स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत असल्‍याचे निदर्शनास येते.
Health Care Tips
Health Care TipsSakal
Updated on

धनश्री काकडे

Women Health: आरोग्‍याच्‍या समस्यांकडे होणारे महिलांचे दुर्लक्ष, अनेकदा गंभीर आजाराला आमंत्रण देते; मात्र महिलांनी आरोग्‍याच्‍या समस्‍या भेडसावत असल्‍यास दुखणे अंगावर न काढता तज्‍ज्ञाचा सल्‍ला घेणे गरजेचे आहे. आजच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पेलत नोकरी, व्‍यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रत्‍येकीने आपल्‍याही आरोग्‍याची निगा राखण्‍याचा सल्‍ला तज्‍ज्ञांनी दिला आहे.

कुटुंब, घर सांभाळत नोकरी करणाऱ्या महिलांचे स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत असल्‍याचे निदर्शनास येते. आरोग्‍याच्‍या समस्‍या भेडसावत असल्‍या तरी अंगावर दुखणे काढत एखादी गोळी घेऊन आपल्‍या दैनंदिन जबाबदारीलाच प्राधान्‍य देणाऱ्या महिलांचा आकडा लक्षणीय आहेत. कुटुंबांची सर्व जबाबदारी एकट्या महिलेवर असते, हे खरे असले तरी तिने स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे केलेले दुर्लक्ष गंभीर आजाराला निमंत्रण देणारा धोका आहे.

अभिनेत्री शमिता हिने सोशल मीडियावर पोस्ट टाकत तिला एंडोमेट्रिओसिस आजाराने ग्रासले असल्‍याचे सांगत शस्‍त्रक्रिया झाल्‍याचे सांगितले. तेव्‍हापासून एंडोमेट्रिओसिस हा आजार नेमका कोणता, असा प्रश्‍‍न चर्चेत आहे. याबाबत शासकीय वैद्यकीय रुग्‍णालयातील स्‍त्रीरोग तज्‍ज्ञ डॉ. श्रीनिवास गडप्‍पा यांच्‍याकडून माहिती घेतला असता हा आजार गंभीर असला तरी वेळेत डॉक्‍टरांचा सल्‍ला घेतल्‍यास औषधोपचाराने सहा महिन्यांत बरा होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, दुर्लक्ष झाल्‍यास शस्‍त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

सद्य:स्‍थितीत या आजाराने ग्रासलेल्‍या महिला रुग्‍णांची संख्‍या शहरात ३० टक्‍के असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या आजाराची लक्षणे पिरियड वेळेत न येणे, थकवा येणे, अति रक्तस्राव, असह्य वेदना, मळमळणे, उलटी होणे आदी आहेत. मात्र, बहुतांश महिला अशा समस्‍या भेडसावत असल्‍या तरी कुणाला काही सांगत नाहीत.

एवढेच काय डॉक्‍टरांकडे गेल्‍यानंतरही मोकळेपणाने बोलणे टाळतात. रुग्‍णालयात न जाता घरगुती उपचार घेतात. परिणामी, असे आजार बळावतात. अभिनेत्री शेट्टी यांनी याबाबत पोस्‍ट टाकून स्‍वानुभव कथन केल्‍यानंतर अनेकांचे या प्रश्‍‍नांकडे लक्ष वेधले. शमिताने या आजाराची लक्षणे आढळल्यास तत्‍काळ तज्‍ज्ञाचा सल्‍ला घ्‍या, असे सांगितले.

Health Care Tips
Health Care : आहारात मीठाचा वापर कमी करा, अन्यथा उच्च रक्तदाब अन् किडनीच्या आजारांचा वाढेल धोका

...म्हणून समस्या वाढत जाते

महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्‍याच्‍या समस्‍या जनजागृतीतून सोडवण्‍यासाठी १९८७ मध्‍ये झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय महिला आरोग्‍य संमेलनात २८ मे हा दिवस जागतिक महिला आरोग्‍य दिन म्‍हणून साजरा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

जनजागृतीतून महिलांनी स्‍वत:च्‍या आरोग्‍याची निगा राखावी, हा उद्देश आहे. मात्र, अनेकवेळा महिलाच स्‍वत:च्‍या आरोग्‍य समस्‍या मोकळेपणाने न मांडता दैनंदिन कामांना प्राधान्‍य देत अंगावर दुखणे काढत असल्‍याने समस्‍या सुटण्‍याऐवजी वाढते, असे निदर्शनास येते. आता महिलांनीच पुढाकार घेत, हा उद्देश सफल करण्‍याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्‍याच्‍या समस्‍या भेडसावत असल्‍या तरी अनेक महिला नॉर्मल असल्‍याचे भासवत अंगावर दुखणे काढतात, असे करू नका, त्रास असल्‍यास औषधोपचार घ्‍या, सकस आहार महत्त्‍वाचा आहेच. पण वेळेत जेवण करा. भुखेची वेळ निघून गेल्‍यानंतर नीट जेवण होत नाही. म्‍हणून पहिली भाकरी झाली की स्‍वत: आधी जेवण केले तरी उत्तम. कारण स्‍वत: निरोगी राहाल तर कुटुंबही निरोगी असेल.

— डॉ. श्रीनिवास गडप्‍पा,( स्‍त्रीरोग तज्‍ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.